नांदेड : वीजग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकसेवा देणाऱ्या महावितरणने मानव संसाधन विभागाचे कामकाज सॅप- ईआरपी प्रणालीद्वारे नुकतेच सुरु केले आहे. त्यामुळे सुमारे ५४ हजार कर्मचाऱ्यांसाठी कार्यरत सर्वच २२५ कार्यालयांमधील मानव संसाधन विभागाचे कामकाज या प्रणालीमुळे ऑनलाईन, जलद, अचूक व मानवी हस्तक्षेपरहित झाले आहे.
यापूर्वी महावितरणच्या मानव संसाधन विभागामध्ये मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालीद्वारे (एचआरएमएस) कामकाज सुरु करण्यात आले होते. यामध्येही मानव संसाधन विभागाचे कामकाज वेगवान झाले. त्याहीपेक्षा अधिक वेगवान व बिनचूक असलेली सॅप- ईआरपी प्रणाली लागू करण्याचा महावितरण व्यवस्थापनाने निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात ही प्रणाली लेखा विभागासाठी सुरु करण्यात आली व त्याची अंमलबजावणी यशस्वीपणे सुरु झाली. त्यानंतर मानव संसाधन विभागासाठी सॅप- ईआरपी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी विशेष लक्ष घालून वेग दिला.
हेही वाचा - हरित जीवनशैलीचा मालेगावकरांचा ध्यास; पर्यावरण समृद्धीसाठी कटीबद्ध
महावितरणच्या मुख्यालयातील महाव्यवस्थापक ( मानव संसाधन ) राजेंद्र पांडे, महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) राजेश भालेकर व उपमहाव्यवस्थापक सुजाता देसाई व सहकाऱ्यांनी राज्यातील प्रादेशिक कार्यालय, परिमंडल, मंडल व विभाग अशा एकूण २२५ कार्यालयांतील मानव संसाधन विभागाचे कामकाज सॅप- ईआरपी प्रणालीद्वारे सुरु करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. ही प्रणाली लागू करण्यापूर्वी महावितरणचे विविध नियम तसेच नियमावलीसोबतच मानव संसाधन विभागाशी निगडित संस्था व्यवस्थापन, वैयक्तिक प्रशासन, नूतनीकरण, वेळव्यवस्थापन, पे- रोल, उच्चवेतनश्रेणी लाभ, प्रशिक्षण, परीक्षा, तपास, बदली, शिस्तभंग कारवाई, गोपनिय अहवाल, अपघात व्यवस्थापन, मालमत्ता व्यवस्थापन, न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सतर्कता, श्रम आणि औद्योगिक संबंध यासारख्या प्रक्रिया अनेक प्रशिक्षण तसेच व्हीडीओ कॉन्फर्सिंगच्या माध्यमातून जाणून घेण्यात आल्या.
येथे क्लिक करा - हळद चुकारे वेळेत मिळेनात; अडत्यासह खरेदीदारांकडून दिड महिन्याचा अवधी
महावितरणच्या मानव संसाधनमधील सॅप-ईआरपीची अंमलबजावणी महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांचा माहे मे महिन्याचे वेतनाची प्रक्रिया पूर्ण करुन सुरु झाली आहे. सॅप-ईआरपी प्रणाली वेगवान व अचूक आहे. सोबतच प्रत्येक क्रिया एकाधिक प्रभाव देत असल्याने एकाधिक नोंदीची कामे टाळली जाणे शक्य आहे. सॅप ईआरपीमध्ये प्रत्येक क्रिया स्वयंचलितपणे असल्याने कर्मचाऱ्यांना त्यांचे दावे वेळेवर मिळणार आहेत. या प्रणालीत मानवी हस्तक्षेप पूर्णपणे टाळण्यात येतो. त्यामुळे महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांना सॅप-ईआरपी प्रणालीद्वारे आता वेतन, भत्ते व इतर अनुषंगिक फायदे यासारख्या सेवा जलद मिळणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.