नांदेड : शहराच्या उत्तर भागात नागपूर- तुळजापूर आणि अकोला या मोठ्या शहराला जोडणारा रस्ता आहे. मात्र हा रस्ता आसना नदीवर असल्याने त्या ठिकाणी दोन पुल आहे. एक नवीन तर दुसरा जुना असून रहदारीसाठी बंद केलेला आहे. त्यामुळे सर्व वाहतुक एकाच नविन पुलावर वातुकीचा ताण पडत आहे. याचा परिणाम असा की वाहतुक खोळंबते. नेहमीच्या ट्राफिक जामला कंटाळलेल्या महामार्ग पोलिसांनी अखेर बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनाच पत्र पाठवून जुन्या पुलाची दुरुस्ती करुन त्यावरुन हलके वाहने जाण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात असे पत्राद्वारे कळविले आहे.
वसमत फाटा (अर्धापूरजवळ) महामार्ग पोलिस केंद्राने पालकमंत्री व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना दोन स्वतंत्र पत्र दिले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161/361 हा सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग यांच्या अंतर्गत होता. सध्या तो भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या अंतर्गत आहे. सन २०१८ मध्ये पुणे येथील धुर्वे कंपनीने उपरोक्त पुलाची तपासणी करून पुलास तडे गेलेले आहेत, परंतु त्याची दुरुस्ती करून हलक्या वाहनांसाठी हा फुल वापरता येऊ शकतो असा अभिप्राय दिला होता. जेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात पुल असताना त्याची दुरुस्ती केली नाही.
संबंधित विभागाने रस्त्यावर मोठे खड्डे खोदले
तत्कालीन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा रस्ता सुरक्षा नांदेड यांच्या निदर्शनास संबंधित विभागाने एका बैठकीत आणून दिले होते. जडवाहतुकीसाठी आसना जुना पूल बंद करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याप्रमाणे पुढे सदर पुलावरून जड वाहतूक बंद करण्यासाठी म्हणून मोठे लोखंडी पूल व बोर्ड लावण्यात आले होते. हलक्या वाहनांना ये- जा करण्यासाठी या पुलाचा उपयोग होत होता. परंतु विघ्नसंतोषी लोकांनी या पुलावर लावलेली लोखंडी पूल तोडल्याने पुन्हा जड वाहतूक सुरू झाली. त्यामुळे एखादी दुर्घटना होऊ नये म्हणून संबंधित विभागाने रस्त्यावर मोठे खड्डे खोदल्याने आता दुचाकी किंवा अन्य वाहनांना सुद्धा ये-जा करणे शक्य नाही.
तासन- तास वाहतूक जाम
या रस्त्यावर आठ ते दहा राज्यांची लहान- मोठी वाहने ये- जा करतात. तसेच अर्धापूर तालुक्यातील व आजूबाजूच्या चाळीस ते पन्नास गावातील लोकांची कार, दुचाकी ये-जा करत असतात. सदर वाहतूक आसनाच्या जुन्या पुलावरून वळविल्यास वाहतुकीचा ताण कमी होऊन तासन- तास वाहतूक जाम होणार नाही. असे महामार्ग पोलिस केंद्राने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
येथे क्लिक करा - नांदेड : शस्त्राचा धाक दाखवून वाटमारी करणारी टोळी जेरबंद- एलसीबी -
साखर कारखान्याच्या ऊसाच्या वाहतुकीला अडथळा
विशेषतः पत्रातील मजकूरात पुढे काही दिवसातच सहकारी साखर कारखाने सुरू होणार आहेत. उसाच्या वाहतुकीसाठी ट्रॅक्टर चालक दोन- दोन ट्रॉली लावतात व ट्रकने सुद्धा उसाची वाहतूक होत असते. सदर परिस्थिती लक्षात घेता या रस्त्यावरील खड्डे बुजविणे गरजेचे आहे. अन्यथा गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा शब्दात महामार्ग पोलिसांनी अशोक चव्हाण यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. भाऊराव सहकारी साखर कारखाना देगाव- येहळेगाव या कारखान्यात मुख्य रस्त्याने ये- जा करावी लागते. हे विशेष या पत्रात महामार्ग पोलिस प्रशासनाने प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नांदेड यांना सुद्धा पत्र पाठवून महामार्गावर पडलेल्या खड्डे दुरुस्ती करावी असेही सुचीत केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.