नांदेड : अडचणीच्या काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ज्या निष्ठावंत शिवसैनिकांनी साथ दिली. त्याच शिवसैनिकांचा विधानसभेची उमेदवारी देताना प्राधान्याने विचार केला जाईल, असे सांगत नांदेड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघांवर शिवसेनेचा दावा राहील, असे शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी मंत्री आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.