नांदेड : कृषी दिनानिमित्त शाळेत शेतीचा जागर

शेतकऱ्यांबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात स्वाभिमान निर्माण करू : सीईओ वर्षा ठाकूर
Agriculture Day
Agriculture Day
Updated on

नांदेड : शेती, शेतकरी आणि खेड्यांशी असलेली बांधिलकी जिल्हा परिषदेच्या शाळांनी अधिक जबाबदारीने जपली. शाळेतील प्रयोगशील शिक्षकांनी आणि जागरूक पालक समित्यांनी याला एक वेगळा आयाम दिला आहे. एकेकाळी जिल्हा परिषदांच्या शाळांकडे केवळ गुणात्मक पातळीवर पाहिले जायचे. हा गुणात्मक दृष्टिकोन जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत अधिक सजग व डोळस करून दाखविल्याचे गौरवोद्गार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी काढले.

विष्णुपूरी येथील जिल्हा परिषद शाळेत वसंतराव नाईक जयंती व कृषि दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या शुक्रवारी बोलत होत्या. यावेळी प्रेरक डॉ. कल्पना मेहता, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास देशमुख, सचिव साहेबराव हंबर्डे, काळेश्वर ट्रस्टचे शंकरराव हंबर्डे, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, मुख्याध्यापक एन. एन. दिग्रसकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत जवळपास आठ हजार ५९९ शिक्षक आहेत. जिल्हा परिषदेच्या एकुण शाळा दोन हजार १९५ आहेत. जवळपास दोन लाख दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. खासगी शाळांसह शिक्षकांची संख्या तीन हजार ७३९ तर या विद्यार्थ्यांसह एकुण सहा लाख ३५ हजार एवढे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या मनात शेतीविषयी आवड निर्माण केली तर त्यांच्या नजरेत शेतकरी घेत असलेले कष्ट सहज उजळून निघतील. शेतीच्या श्रमाला त्यांच्या मनातही प्रतिष्ठा निर्माण होईल, असा विश्वास वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केला.

सीईओंनी घेतला विद्यार्थ्यांचा शेतीवर तास

मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी विष्णुपुरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील दहावी ‘क’ मधील विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत कृषि विषयाबाबत एक तास घेतला. तुम्ही केवळ विद्यार्थी नाहीत तर देशाची प्रेरणा आहात. आपले आई-वडील ग्रामीण भागातले आहेत. त्यांना शेतीच्या कामामध्ये आपण मदत करण्यासाठी सदैव तत्पर असले पाहिजे. यातूनच कामाप्रती आपल्या मनात प्रतिष्ठा निर्माण होते. सातत्य, परिश्रम, आणि अभ्यास याची योग्य जोड आपल्या लावता आली पाहिजे. आपला सभोवताल प्रत्येकाने लक्षात ठेवला पाहिजे. यातूनच प्रत्येकाला आपले ध्येय गाठता येईल, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.