नांदेड : ‘त्या’ ३१८ कर्मचाऱ्यांना जामीन

अर्धापूर तालुक्यातील शाळा सुरळीत चालू राहणार
Ardhapur Panchayat Samiti 318 employees Bail
Ardhapur Panchayat Samiti 318 employees Bailsakal
Updated on

अर्धापूर : मुख्यालयी न राहता घर भाडे उचललेल्या पंचायत समितीच्या अंतर्गत अर्धापूर तालुक्यातील ३१८ कर्मचाऱ्यांवर न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. यात शिक्षक व ग्रामसेवकांचा समावेश होता. या प्रकरणातील सर्व आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. हा जामीन मंजूर झाल्याने शाळा सुरळीत चालू राहणार असून गावगाडा पूर्वी प्रमाणे चालणार आहे. या कर्मचाऱ्यांवर अटकेची टांगती तलवार होती ती भिती आता न्यायालयाच्या आदेशाने संपली आहे.

अर्धापूर पंचायत समितीच्या अंतर्गत गावात कार्यरत असलेल्या शिक्षक व ग्रामसेवकांनी मुख्यालयी न रहाता घर भाडे उचललेल्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सय्यद युनुस यांनी पाठपुरावा करून प्रकरण अर्धापूर न्यायालयात दाखल केले होते. अर्धापूर न्यायालयाच्या आदेशानुसार अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात २९२ शिक्षक तर २६ ग्रामसेवकांचा समावेश होता. आपली अटक टाळण्यासाठी हे कर्मचारी सर्व पातळ्यांवर प्रयत्न करित होते.

या प्रकरणी अटक पुर्व जामीन मिळण्यासाठी नांदेड जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून तारखा मिळत होत्या. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जामीन मंजूर करण्यात आला आहे. शिक्षक व ग्रामसेवकावर अटकेची टांगती तलवार होती. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर अटकेपासून सुटका मिळाली आहे. या आदेशामुळे शाळा सुरळीत चालू राहणार आहेत तर गावातील ठप्प झालेली कामे सुरू होणार आहेत.

आमचा न्याय देवतेवर विश्वास असून न्यायालयाने आमचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या बाबतीत आम्ही समाधानी आहोत. अशी प्रतिक्रिया शिक्षक व ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.