नांदेड - लोकशाहीच्या उत्सवाला बुधवारी (ता.२०) सुरवात होत आहे. नांदेड लोकसभा व जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांत मतदान होत आहे. यासाठी सर्व मतदारसंघांत तयारी झाली असून मंगळवारी ३ हजार ८८ मतदार केंद्रांवर पथके रवाना झाली आहेत..लोकसभेचे १९ लाख ८ हजार, तर विधानसभेसाठी २७ लाख ८७ हजार ९४७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. लोकसभा पोटनिवडणुकीतील १९, तर विधानसभा रिंगणातील १६५ उमेदवारांचे भविष्य बुधवारी पेटीबंद होणार आहे. दरम्यान, केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे..गेली अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा असलेल्या निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होत आहे. आज सकाळी ७ वाजेपासून निवडणूक कर्मचारी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये एकत्रित आले होते. अंतिम प्रशिक्षणानंतर पोलिंग पार्ट्या मतदान केंद्राकडे साहित्य घेऊन रवाना झाल्या. प्रशासनासोबतच राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही मंगळवारी (ता.१९) वस्त्या, झोपडपट्ट्यांमध्ये आपापली शक्ती पणाला लावली.राजकीय पक्षांच्या नेत्यांनी काही नाराज असलेल्यांना आजही भेटून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय बुधवारी मतदानासाठी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठीही काहींनी मोर्चेबांधणी केली. प्रशासन व पक्षाचे नेते, उमेदवारांनी मंगळवारी रात्रीपर्यंत केलेल्या तयारीला बुधवारी मतदार कसा प्रतिसाद देतात, याकडे आता लक्ष लागले आहे..विद्यापीठात होणार मतमोजणीस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापाठीच्या ज्ञान स्रोत केंद्र इमारतीमध्ये लोकसभा पोटनिवडणूक व सहा विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीची मतमोजणी शनिवारी (ता.२३) होणार आहे. याठिकाणी लोकसभेसाठी सहा व विधानसभेसाठी सहा अशा १२ मतमोजणी केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच, स्ट्राँग रूमची निर्मिती करण्यात आली आहे. लोहा, हदगाव, किनवट या तीन विधानसभा क्षेत्राची मतमोजणी मात्र त्या-त्या ठिकाणी होणार आहे..एका शाईत दोनदा मतदानबुधवारी लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात सकाळी ७ ते सायंकाळी ६ या कालावधीत मतदान होत आहे. यावेळी सर्व मतदारांना वेगळा अनुभव येणार असून २५ वर्षांनंतर नांदेडला एका शाईमध्ये दोनदा मतदान करता येणार आहे. तरी, नागरिकांनी आपले अमूल्य मत देशासाठी द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले..वोटर टर्नआउट ॲपचा वापर करामतदानाच्या संदर्भात आकडेवारी व किती मतदान झाले याबाबत सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता असते. त्या सर्वांनी वोटर टर्नआउट ॲप डाऊनलोड करावे. यावर माहिती ठरावीक वेळेनंतर अपलोड होणार आहे. यावेळी निवडणूक आयोगाने पोलिंग पार्ट्याचे संगणकीकृत प्रणालीद्वारे ट्रेकिंग केले जाणार आहे. चक्रीका असे या प्रणालीचे नाव आहे.याशिवाय या निवडणुकीत जिल्ह्याच्या व प्रत्येक निवडणूक केंद्राच्या मुख्यालयात कंट्रोल रूम स्थापन केले आहे. याशिवाय आपले मतदान केंद्र शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लिंक जारी केली असून https://deonanded.in/ps.php या लिंकवर आपले मतदान केंद्र शोधता येणार आहे..आरोग्य, पायाभूत सुविधांची उपलब्धताजिल्ह्यातील ३ हजार ८८ मतदान केंद्रांवर पायाभूत सुविधा व आरोग्याच्या सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. दिव्यांगासाठी रॅम्प, व्हीलचेअर, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, टेबल, खुर्ची, लाइट, पंखा आदींची सुविधा करण्यात आली आहे. तसेच, सध्या थंडीमुळे दिवस लवकर मावळत असल्याने केंद्राबाहेर लाइटची व्यवस्था करण्यात आली आहे.याशिवाय त्या-त्या ठिकाणच्या आरोग्य उपकेंद्रात आरोग्यची टीम सज्ज राहणार आहे. तत्काळ सेवा देण्यासाठी आशा, अंगणवाडी कार्यकर्तींमार्फत ओआरएसचा पुरवठा केला जाणार आहे, असे नोडल अधिकारी (एएमएम) संदीप माळवदे यांनी सांगितले.#ElectionWithSakal.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.