नांदेड : विक्की ठाकूर खून आणि गोळीबार प्रकरणातील बिगानिया टोळीतील अकरा आरोपींवर मोक्का अंतर्गत दोषारोपपत्र पोलिस विभागाने मोक्का न्यायालयात मंगळवारी (ता. २८) दाखल केले आहे. (Vicky Thakur murder case)
इतवारा पोलिस ठाण्यातंर्गत ता. २० जुलै रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गाडीपुरा भागातील रेणुकामाता मंदिराच्या जवळ तीन जणांनी दुचाकीवर येऊन गावठी कट्टे, तलवार, खंजरसह येऊन विक्की ठाकूर याचा खून केला होता. तसेच त्याचा मित्र सुरज खिराडे यास ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात नितीन जगदीश बिगानिया, दिगंबर टोपाजी काकडे, मुंजाजी उर्फ गब्या बालाजी धोंडगे, गंगाधर अशोक भोकरे, सोमेश उर्फ सोम्या सुरेश कत्ते, कृष्णा उर्फ किन्ना छगनसिंग परदेशी, लक्ष्मण उर्फ लक्की बालाजी मोरे पाटील, कैलास जगदीश बिगानिया, अंजली नितीन बिगानिया आणि ज्योती जगदीश बिगानिया यांना अटक करून तपास केला.
या आरोपींचे संघटित गुन्हेगारीचे रेकॉर्ड आढळून आल्याने त्यांच्याविरूद्ध मोक्का कलम वाढ करण्याचा प्रस्ताव पोलिस निरीक्षक नरवाडे यांनी पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्याकडे पाठवला. त्यानुसार अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, उपविभागीय अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यानंतर ता. १३ आक्टोंबर रोजी परवानगी मिळाली. त्यावरून अतिरिक्त पोलिस महासंचालक यांच्या कार्यालयात प्रस्ताव दाखल करून परवानगी घेण्यात आली. त्यानुसार मोक्का कलमातंर्गत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, बिगानिया टोळीविरूद्ध मोक्का लावण्यापूर्वी २०२० मध्ये जुना मोंढा भागात झालेल्या गोळीबार प्रकरणात लखन ठाकूर डी गॅंगच्या सहा आरोपींविरूद्ध मोक्का अंतर्गत कार्यवाही करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.