Nanded : ४ हजार ४९६ शेतकरी अनुदानासाठी पात्र

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ
nanded farmer news
nanded farmer newsesakal
Updated on

किनवट : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी तालुक्यातील ४ हजार ४९६ शेतकऱ्यांची माहिती शासनाकडे ऑनलाइन पाठविण्यात आली होती.

nanded farmer news
Nanded : शिधा पोचविण्यासाठी प्रशासन घेत आहे परिश्रम

यापैकी पहिल्या टप्प्यात योजनेसाठी मुदतीत कर्जफेड करणाऱ्या ५५१ शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठविण्यात आलेला आहे. ताज्या माहितीनुसार यापैकी ४६४ शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणिकरण केले आहे, अशी माहिती येथील सहाय्यक निबंधक सी.एस.मगर यांनी दिली.

nanded farmer news
Nanded : हजारो शिक्षकांसाठी काळी दिवाळी

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अल्पमुदत पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. कोरोनामुळे गेली दोन-तीन वर्षे शासनाच्या तिजोरीत पैसाच नव्हता. त्यामुळे कर्जाची नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना अडीच वर्षे वाट पाहावी लागली.

nanded farmer news
Nanded : पाणी पुरवठा योजनेचे काम कासवगतीने

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्वीच्या निकषात काही बदल करीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानुसार २०१७-१८ ते २०१९-२० या तीन वर्षांत दोन वर्षे कर्जाची नियमित परफेड केली असल्यास त्यांना अनुदान देण्याचा निर्णय झालेला आहे. तसेच २०१९ मध्ये अतिवृष्टी, महापुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेसाठी किनवट तालुक्यातील एकूण ४ हजार ४९६ शेतकरी पात्र ठरले आहेत.

nanded farmer news
Nanded : भाऊराव कारखान्याची निवडणूक बिनविरोध

आधार प्रमाणीकरण करून घ्यावे

ही प्रक्रिया संपूर्णत: संगणकीकृत असल्याने पात्र शेतकऱ्यांनी गोंधळून न जाता आपल्या मोबाईलवर विशिष्ट क्रमांक प्राप्त झाल्यानंतर संबधित बँक वा आपले सेवा केंद्र येथे जाऊन, आपल्या कर्जखात्याचे आधार प्रमाणीकरण करून घेण्याची प्रक्रिया पार पाडावी, त्यासाठी आपले आधार कार्ड, विशिष्ट क्रमांक, बँक पासबुक आदी कागदपत्रे सोबत ठेवावीत.

nanded farmer news
Nanded : खासदारांनी लक्ष दिले असते तर दिवाळीत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले असते

त्यामुळे पहिल्या टप्प्यातील उर्वरीत ८७ लाभार्थ्यांनी त्वरित आपले आधार प्रमाणिकरण करून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. मृणाल जाधव आणि सहायक निबंधक सी.एस. मगर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.