नांदेड : निकृष्ट कामाची देयके रोखली

भोकर तालुक्यातील प्रकार : प्रत्यक्ष पाहणी करून कार्यकारी अभियंताची कार्यवाही
nanded Bhokar Zilla Parishad various schemes fund for development of villages stopped
nanded Bhokar Zilla Parishad various schemes fund for development of villages stoppedsakal
Updated on

भोकर : जिल्हा परिषदेमार्फत गावांच्या विकासासाठी विविध योजनेचा निधी उपलब्ध होतो मात्र निकृष्ट दर्जाची कामे करून देयके उकळली जातात अशी अनेक उदाहरणे आहेत. माजी सभापती बाळासाहेब रावणगावकर यांच्या गावातील पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत करण्यात आलेला सिमेंट रस्ता, नालीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता (बांधकाम) यांनी कामाची पाहणी करून देयके रोखली असल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.

बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विविध योजनांमधून भोकरला विकास निधी उपलब्ध करून दिला, तशी कामे ही मंजूर करून दिली आहेत. गावाच्या विकासासाठी सुद्धा प्रत्येक ग्रामपंचायती अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचा निधी जिल्हा परिषदेच्या मार्फत उपलब्ध करून दिला आहे. बहुतांश ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे उरकून देयके काढण्यात आली. कामांच्या दर्जाबाबत शंका व्यक्त केली जात आहे. विविध प्रकारच्या निधीची कामे एकाच ठिकाणी दाखवून देयके उचलल्याची सुद्धा चर्चा आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या कामाची चौकशी केल्यास पितळ उघडे होऊ शकते.

निकृष्ट कामाची देयके रोखली

रावणगाव येथील ग्रामपंचायत अंतर्गत ८ लाखांचा सिमेंट रस्ता, ९ लाखाची नाली बांधकाम असे १७ लाख निधी मंजूर झाला सदर काम हलक्या व निकृष्ट दर्जाचे झाले होते. काम तपासण्यासाठी भोकर जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. तायडे यांनी गावात जाऊन कामांची पाहणी केली. काम निकृष्ट दर्जाचे झाले हे पाहून सदर कामाचे देयक काढू नये अशा सूचना उप अभियंता यांना दिल्या. १७ लाख रूपयाची देयक रोखले त्यामुळे चर्चेचा विषय झाला आहे.

स्मशानभूमीचे बांधकाम पाडले

जनसुविधा योजनेअंतर्गत रावणगाव येथे (६ लाख रुपये) मंजूर झाले होते. ग्रामपंचायती अंतर्गत सदर स्मशानभूमीचे काम अत्यंत हलक्‍या व निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याने संबंधित अभियंत्यांनी सदर कामाबाबत ग्रामपंचायतीला सूचना केल्याने स्मशानभूमीचे झालेले काम पाडून घ्यावे लागले. विकासाचा डंका वाजवणाऱ्या रावणगावमध्ये अशा प्रकारची किती कामे झाली हे संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणे गरजेच आहे.

अन् उसापोटी कावस

तालुक्यातील रावणगाव येथील ग्रामपंचायतने विकासात्मक कामे करून नवा आदर्श निर्माण केला असला तरी तितक्याच प्रमाणात गैरप्रकार झाल्याने चांगल्या कामासोबतच निकृष्ट कामाची चर्चा सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी कामाची देयके रोखल्याने ‘निकृष्ट’ कामाची स्पष्टता अधोरेखित होते आहे. ‘ऊसापोटी कावस’ असा प्रकार पालकमंत्र्याच्या मतदारसंघात होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.