नांदेड - नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील समर्थ विकास पॅनलने भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखालील सहकार विकास पॅनेलची दाणादाण केली. दरम्यान या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांना पराभव पत्करावा लागला आहे.
रविवारी दुपारी संपूर्ण निकाल जाहीर झाल्यानंतर तहसील कार्यालय परिसरामध्ये महाविकास आघाडी प्रणीत समर्थ विकास पॅनेलच्या विजयी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तसेच ‘नांदेडमध्ये आवाज खाली शेर की झलक, सबसे अलग’, ‘टायगर अभी जिंदा है’ असे फलक पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या छायाचित्रासह सोशल मीडियावर व्हायरल देखील केले. तर दुसरीकडे सकाळी १० वाजेनंतर चित्र स्पष्ट झाल्यानंतर भाजप प्रणीत सहकार विकास पॅनेलचे उमेदवार तसेच कार्यकर्त्यांनी मतमोजणी परिसरातून काढता पाय घेतला.
समर्थ विकास पॅनलने २१ जागांपैकी १७ जागांवर विजय
विशेष म्हणजे यंदाची जिल्हा बॅंकेची निवडणूक ही पालकमंत्री अशोक चव्हाण आणि भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. त्यामुळे एक महिन्यापासून चांगलाच राजकीय धुराडा जिल्ह्यात बघायला मिळाला. अखेर अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील समर्थ विकास पॅनलने २१ जागांपैकी १७ जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळवून दिले.
तीन उमेदवार बिनविरोध
तसेच या निवडणुकीमध्ये असंख्य दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले. यामध्ये कंधार सेवा सहकारी मतदारसंघात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव गोविंदराव पांडागळे, नायगाव सेवा सहकारी संस्था मतदार संघातून भाजपचे दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटुरकर, नांदेड सेवा सहकारी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शीला कदम, नागरी बॅंक पत संस्था मतदार संघातून भाजपचे दिलीप कंदकुर्ते आदी दिग्गजांना पराभव पत्करावा लागला आहे. या निवडणुकीत इतर मागासवर्गीय मतदार संघातून राष्ट्रवादीचे हरिहरराव भोसीकर हे सर्वाधिक ७०७ मते घेवून विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमाकांत गोपछडे यांचा पराभव केला. श्री. गोपछडे यांना २०३ मिळाली आहेत. यापूर्वीच कॉँग्रेसचे बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर तर भाजपचे भास्करराव पाटील खतगावकर हे बिनविरोध निवडणून आले होते.
खासदार चिखलीकरांना दणका
जिल्हा बॅंकेवर पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणजेच महाविकास आघाडीने वर्चस्व मिळवले आहे. गेल्यावेळी भाजपने कॉँग्रेसला एकाकी पाडत जिल्हा बॅंकेची सत्ता मिळवली होती. परंतु, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना अशोक चव्हाण यांनी जिल्हा बॅंकेत परिवर्तन घडवल्याचे रविवारच्या निकालावरून स्पष्ट होत आहे. जिल्हा बॅंकेत महाविकास आघाडीने सर्वाधिक जागा मिळवत भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना चांगलाच दणका दिल्याचे दिसून आले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.