Nanded : चिमूकल्याने गिळला होता अडीच इंचाचा लोखंडी खिळा, डॉक्टरांनी दिले जीवनदान

डॉ. कैलाश कोल्हे यांच्याकडून एंडोस्कोपी, तासाभरानंतर यश
medical
medical esakal
Updated on

नांदेड : हळदा (ता.कंधार) येथील साडेतीन वर्षांच्या मुलाने अडीच इंचाचा लोखंडी खिळा गिळला होता. पोटात अडकलेला हा खिळा यशस्वीरीत्या बाहेर काढून डॉक्टरांनी त्याला जीवनदान दिले आहे. कोणत्याही शस्त्रक्रियेविना डॉक्टरांनी हे काम केले.

गणेश महारुद्र येलमीटवाड (वय साडेतीन वर्षे) याने हा गेल्या गुरुवारी घराच्या अंगणात खेळत होता. खेळत असताना त्याने अडीच इंचाचा खिळा गिळला. त्याच्या आईला ही बाब समजली. शौचावाटे खिळा बाहेर पडण्यासाठी त्याला केळी खाऊ घातली. मात्र, मुलाला उलट्या सुरू झाल्या. घाबरलेल्या आई-वडिलांनी त्याला नायगाव येथील खासगी दवाखान्यात दाखल केले.

तेथून नांदेडमधील पोटविकारतज्ज्ञ डॉ. कैलाश कोल्हे यांच्याकडे आणण्यात आले. डॉ. कोल्हे यांनी भूलतज्ज्ञ डॉ. अश्विन करे, मेंदूविकार तसेच बालरोगतज्ज्ञ डॉ. पंकज राठी यांच्या मदतीने एक तासाच्या प्रयत्नानंतर कुठलीही शस्त्रक्रिया न करता तासाभरानंतर एंडोस्कोपीद्वारे खिळा बाहेर काढून गणेशला जीवदान दिले. बालरोगतज्ज्ञ डॉ. रमेश रेंगे यांचेही सहकार्य मिळाले.

हाताळली अनेक प्रकरणे

डॉ. कैलाश कोल्हे यांनी सुमारे वीसपेक्षा अधिक प्रकरणे येथे तर मुंबईमध्येही असताना शंभरपेक्षा अधिक अशी प्रकरणे हाताळली आहेत. ती यशस्वी केली आहेत. लहान मुलांनी खेळण्यातील सेल गिळल्याचीही त्यांनी नऊ प्रकरणे हाताळली आहेत. एंडोस्कोपीद्वारे सेल बाहेर काढण्यात त्यांना यश आले आहे. त्यांच्या या कामाची राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय नियतकालिकांनीही दखल घेतली आहे. युरोपातील विशेष पदवीने ते नुकतेच सन्मानित झाले आहेत.

medical
Nanded : चिमण्यांचा चिवचिवाट झाला कमी

लहान मुले खेळता खेळता दिसेल ती वस्तू तोंडात टाकतात. आपण काय खात आहोत हे त्यांनाही माहीत नसते. त्यामुळे लहान मुलांच्या हाती नाणी, पीन, खिळा किंवा इतर वस्तू लागणार नाहीत, याबाबत पालकांनी दक्ष असायला हवे.

- डॉ. कैलाश कोल्हे, पोटविकारतज्ज्ञ, नांदेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.