नांदेड : इथे अंधारात करावे लागतात 'अंत्यसंस्कार'

एकाही स्मशानभूमीत पथदिव्यांची सोय नाही : काही ठिकाणी अतिक्रमण
Nanded citizen concern Funeral in dark no streetlights cemetery
Nanded citizen concern Funeral in dark no streetlights cemeterysakal
Updated on

हिमायतनगर : तुला अखेर इथेच यायचं होत. येता येता आयुष्य संपून गेलं. या जगापासून तुला काय मिळालं. तुझ्या लोकांनीच तुला जाळून टाकलं. आयुष्यातला पहीला लंगोट, त्याला खिसा नव्हता. आणी हे शेवटचे कफन. त्यालाही खिसा नाही. मग आयुष्य भर खिसा भरण्यासाठी इतकी धडपड कश्याला केलीस, अशी पाटी शेवटचा मुक्काम असलेल्या स्मशानभूमीत अवश्य पाहायला मिळेल. याच शेवटचा मुक्काम असलेल्या तालुक्यातील एकाही स्मशानभूमीत पथदिवे तर नाहीत, मात्र अनेक स्मशानभूमीला अतिक्रमणांचा विळखा बसलेला पहावयास मिळत आहे.

हिमायतनगर तालुक्यात ६५ गावे, वाडी-तांडे असून एकाही स्मशानभूमीत विजेची सोय नसल्याने रात्री अंत्यसंस्कार अंधारातच करण्याची वेळ येत आहे. तर तालुक्यात बहुतांश स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने स्मशानभूमी दिवसेंदिवस लहानच होताना दिसत असून तालुक्यातील अनेक स्मशानभूमीला संरक्षण भिंत नाहीच, मृतदेह जाळण्यासाठी टिनशेडचा अभाव आहे. तालुक्यात विरसणी, वाळकेवाडी ग्रामपंचायत, दुधड, एकघरी, किरमगाव, ग्रामपंचायत वाघी, वटफळी, बोरगडी तांडा, बोरगडी, पारवा बु, पारवा खु, बोरगाव, कार्ला, मंगरूळ, पळसपूर, वडगाव या १४ गावात गायरान जमिन असून भूसंपादन करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केलेला आहे.

तर शेल्लोडा ग्राम पंचायत सिरपल्ली या गावात शासकीय जागाच उपलब्ध नसल्याने खासगी जमिन मिळण्यासाठी पंचायत समितीसह तालुका दंडाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे प्रस्ताव सादर केलेला आहे.तर मोरगाव ग्रामपंचायत पारवा बु. कामारवाडी, बळीराम तांडा, वाई, पिंपरी, दुधड या गावातील स्मशानभूमीसाठी आजपर्यंत प्रस्ताव सादर केलेला नाही. तालुक्यात स्थानिक हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागात सर्व धर्मीय समाजासाठी ९७ ठिकाणी स्मशानभूमीची जागा आहे. तर ४६ गावामध्ये स्मशानभूमीत विकास कामे करता येतील. तसेच तालुक्यातील १७ गावामधील स्मशानभूमीत विकासाची कामे करण्यास जागाच उपलब्ध नाही.

त्याबरोबर २७ गावामध्ये गायरान जमीन असून २९ गावांमध्ये गायरान जमिन आहे. तर तालुक्यात फक्त पारवा खू., खैरगाव ता., कामारवाडी येथील शेतकरी स्मशानभूमीसाठी विकत जागा देण्यास तयार आहेत. १२ ठिकाणीच स्मशानभूमी शेड व सांगडा आहे तर तब्बल ४५ गावात हा अभाव आहे. ४१ ठिकाणी स्मशानभूमीसाठी रस्ताच नाही. या वरून तालुक्यात स्मशानभूमीच्या सर्व प्रकारच्या विकासात्मक कामांकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

अतिक्रमणाविषयी आतापर्यंत कुठल्याही तक्रारी आलेल्या नाहीत, स्मशानभूमीच्या जागेवर कोणी जर अतिक्रमण केले असेल त्या संदर्भात तक्रारी आल्यास प्रशासन आवश्यक ती कारवाई करेल. ज्या गावात स्मशानभूमीसाठी जागा नाही, त्या गावाचा कोणीही शेतकरी जमिन देण्यास तयार असल्यास बाजार भावाच्या कितीतरी पटीने जास्त दराने जमिन विकत घेवू.

- मयूर अंदेलवाड, गटविकास अधिकारी.

ज्या जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. त्या जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचा शासनाच्या आदेशानुसार प्रशासन पुरेपूर प्रयत्न करेल. ज्या गावात स्मशानभूमीसाठी जागा नाही, त्या गावातील गायरान जमीनी ताब्यात घेऊन स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करू.

- अनिल तामसकर, नायब तहसीलदार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.