नांदेड - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. शासकीय आणि खासगी रुग्णालय फुल्ल झाले आहेत. अशात कोरोनाच्या चाचण्यांचा वेग मंदावल्याने रविवारी (ता.२०) ९९६ जणांचा अहवाल आला. यात ६८७ निगेटिव्ह २४० जणांचे स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात सहा रुग्णांचा मृत्यू आणि ३२४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
शनिवारी (ता. १९) तपासणीकरिता घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी रविवारी (ता.२०) ९९६ जणांचे आहवाल प्राप्त झाले. यातील ६८७ निगेटिव्ह तर, २४० जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या १३ हजार ५५६ वर पोहचली आहे. रविवारी दिवसभरात सावित्रीबाई फुले नगर नांदेड पुरुष (वय २९), नमस्कार चौक नांदेड पुरुष (वय ९०), जोशी गल्ली नांदेड पुरुष (वय ६७), देगलूर नाका नांदेड पुरुष (वय ६४), पेठवडज कंधार पुरुष (वय ५७), औराळा कंधार पुरुष (वय ४०) या सहा कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यातील ३५६ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
हेही वाचा- व्हिडीओ - कोरोना चाचणीसाठी नांदेड जिल्हा प्रशासन गंभीर नाही
नऊ हजार ३७८ इतक्या रुग्णांनी कोरोनावर मात
विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयातून- २४, जिल्हा रुग्णालयातील- १२ यासह, पंजाब भवन, यात्री निवास, महसूल भवन, होम आयसोलेशन असे मिळून - १४९, अर्धापूर- ११, धर्माबाद- सात, किनवट- १७, मुखेड-२४, उमरी- ११, बिलोली- २१, कंधार-नऊ, लोहा-११, खासगी रुग्णालय-२७ आणि हैदराबाद येथे संदर्भित एक असे ३२४ रुग्ण दहा दिवसाच्या उपचाराने कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालय व कोविड सेंटरमधून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत नऊ हजार ३७८ इतक्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
हेही वाचले पाहिजे- दत्ता बापूंनी जमिनीशी नातं कधीच तुटु दिले नाही
रविवारी या भागात आढळून आले कोरोना रुग्ण ः
नांदेड मनपा क्षेत्र-११९, नांदेड ग्रामिण- सहा, कंधार-पाच, हदगाव-आठ, मुखेड-दोन, बिलोली-१२, अर्धापूर-१६, किनवट-पाच, उमरी-नऊ, धर्माबाद- चार, देगलूर-तीन, नायगाव- सहा, मुदखेड-सात, लोहा- सहा, भोकर- आठ, हिमायतनगर- नऊ, परभणी- एक, हिंगोली- आठ, यवतमाळ- सहा असे २४० जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या १३ हजार ५५६ वर गेली आहे. सध्या तीन हजार ७५५ बाधित रुग्णावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ४२ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.
कोरोना मीटर ः
रविवारी कोरोना पॉझिटिव्ह - २४०
रविवारी कोरोनामुक्त- ३२४
रविवारी मृत्यू- सहा
एकूण कोरोना पॉझिटिव्ह- १३ हजार ५५६
एकूण कोरोना मुक्त- नऊ हजार ३७८
एकूण मृत्यू- ३५६
उपचार सुरु- तीन हजार ७५५
गंभीर रुग्ण- ४२
प्रलंबित आहवाल- एक हजार १३२
|