Corona Updates : नांदेड जिल्ह्यात पाच जण कोरोनाबाधित

3korona_60
3korona_60
Updated on

नांदेड : जिल्ह्यात शनिवारी (ता.२८) प्राप्त झालेल्या एक हजार ५९९ अहवालांपैकी पाच अहवाल कोरोनाबाधित (Corona) आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या ९० हजार ७३३ एवढी झाली असून यातील ८८ हजार ४७ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला २५ रुग्ण उपचार घेत असून दोन बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६६१ एवढी आहे. शनिवारच्या बाधितामध्ये मुखेड -एक, नायगाव (Naigaon) - चार असे एकूण पाच बाधित आढळले. शनिवारी दिवसभरात जिल्ह्यातील (Nanded) पाच कोरोना बाधितांना रुग्ण औषधोपचारानंतर बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आली आहे. यात मुखेड (Mukhed) -एक, मनपाअंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण- चार व्यक्ती अशा पाच व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सध्या २५ कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. त्यापैकी दोन बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.

3korona_60
बायोडिझेलचा काळाबाजार, तिघा जणांना अटक

कोरोना मीटर

एकूण पॉझिटिव्ह व्यक्ती - ९० हजार ७३३

रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या - ८८ हजार ४७

एकूण मृत्यू संख्या - दोन हजार ६६१

शनिवारी पॉझिटिव्ह - पाच

शनिवारी कोरोनामुक्त - पाच

शनिवारी मृत्यू - शून्य

उपचार सुरू - २५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.