Nanded : अडीच हजार गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा

जिल्ह्यात सव्वा चार लाख पशुधनाचे लसीकरण
Lumpy skin disease
Lumpy skin diseasesakal
Updated on

नांदेड : गाय वर्ग पशुधनातील लम्पी आजाराचा अधिक फैलाव होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे लसीकरणासह जनावरांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील एकुण ८७२ बाधित गावात दोन हजार ४२७ गाय वर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली आहे.

जिल्ह्यात आतापर्यत ११० पशुधन मृत्यूमुखी पडले असून आजारातून बरे झालेल्या पशुधनाची संख्या एक हजार ४७१ आहे. औषधोपचार चालू असलेले पशुधन ८४६ आहे. सद्यस्थितीत लसीकरण केले जात आहे. सद्यस्थितीत चार लाख १५ हजार ६३६ प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे. मृत्त पशुधनाच्या लाभार्थ्यांची संख्या ३१ वर पोहचली आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध लसमात्रा असून पशुपालकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.