नांदेड : भाजपचा डाव उधळत काँग्रेस ठरली वरचढ

सुभाष साबणे यांना पुन्हा धोबीपछाड; जितेश अंतापूरकर ४१ हजार ९३३ मतांनी विजयी
congress
congress sakal media
Updated on

देगलूर, बिलोली : पंढरपुरची पुनरावृत्ती करू असे नियोजन करून भाजप (BJP) निवडणूक रिंगणात ( deglur biloli bypoll election) उतरली होती. मात्र, महाविकास आघाडीने (mva government) नियोजनबध्द प्रचारयंत्रणा अखेरपर्यंत कार्यान्वीत ठेवून भाजपला पराभूत केले. कॉँग्रेसचे (congress) उमेदवार जितेश रावसाहेब अंतापूरकर (jitesh antapurkar) यांनी भाजपचे उमेदवार सुभाष साबणे (subhash sabne) यांचा ४१ हजार ९३३ मतांनी पराभव केला. अंतापूरकर यांना एक लाख आठ हजार ८४० मते मिळाली. श्री. साबणे यांना ६६ हजार ९०७ एवढी मते पडली तर तिसऱ्या क्रमांकाची मते वंचित बहुजन आघाडीचे डॉ. उत्तम इंगोले (dr uttam ingole) यांना ११ हजार ३४८ मते मिळाली.

congress
शिवाजी पार्कचे मोगल पार्क होऊ देणार नाही; शिवसेनेविरुद्ध भाजप आक्रमक

देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मतदार संघाचा महत्त्वाचा भाग असलेल्या बिलोली तालुक्यातून काँग्रेसला सोळा हजार २३८ मतांचे मताधिक्य मिळाले आहे. बिलोली तालुक्यात कुंडलवाडी व बिलोली या दोन नगरपालिका व जिल्हा परिषद गट आहेत‌. त्यामुळे हा भाग या मतदारसंघात महत्त्वाची भूमिका बजावणारा भाग आहे. त्यातच माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार गंगाधरराव पटणे, माजी आमदार गंगाराम ठक्करवाड यांचे या भागात अनेक वेळेला वर्चस्व राहिले आहे. खतगावकर यांनी काँग्रेसकडून तर माजी आमदार गंगाराम ठक्करवाड यांनी भाजपकडून प्रचार मोहिमेत सहभाग नोंदवला. त्याचबरोबर माजी आमदार गंगाधर पटणे यांनी जनता दल सेक्युलरकडून देगलूरचे माजी नगराध्यक्ष विवेक केरूरकर यांना निवडणूक रिंगणात उतरविले होते.

निवडणुकीची मतमोजणी बिलोली तालुक्यातील कोळगाव येथून सुरुवात झाली. सुरुवातीच्या फेरी पासूनच महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर हे एक ते दीड हजार मताधिक्‍याने पुढे सरकत राहिले. बिलोली तालुक्यातील दोन नगरपालिकेसह ७३ ग्रामपंचायतीमधील मतमोजणी १३ फेऱ्यांमध्ये पूर्ण करण्यात आली.

बिलोलीतून निर्णायक आघाडी

बिलोली तालुक्यात बिलोली आणि कुंडलवाडी या दोन नगरपालिका आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांना निर्णायक आघाडी मिळाली. प्रत्येक फेरीत मताधिक्य आहे. काँग्रेसच्या विजयासाठी भर पाडत असल्याचे चित्र प्रारंभी पासूनच निर्माण झाले होते. बिलोली तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतीसह दोन नगरपालिकेतील प्रचाराची सूत्र कॉँग्रेसचे विधानपरिषदेचे प्रतोद आमदार अमर राजूरकर, बांधकाम सभापती संजय बेळगे, बिलोलीचे माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजी पाटील पाचपिंपळीकर, माजी नगराध्यक्ष भीमराव जेठे, उत्तम जेठे आदी प्रमुखांकडे सोपविण्यात आले होते.

congress
मुंबई : आरेतील रस्त्यांबाबत उच्च न्यायालयात याचिका

भास्करराव पाटील खतगावकर ठरले ‘गेमचेंजर’

देगलूर - बिलोली पोट निवडणुकीच्या तोंडावर भाजपातील ज्येष्ठ नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी जिल्ह्यातील एकाधिकारशाहीला कंटाळून पुन्हा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मागील विधानसभा निवडणुकीत खतगावकर यांनी भाजपमध्ये राहून अंतापुरकरांना सहकार्य केल्यामुळे बिलोली तालुक्यातील अंतापुरकरांना सात हजाराचे मताधिक्य मिळाले होते. रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांना बिलोली तालुक्यातून १६ हजार २३८ मतांचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे खतगावकर हे पुन्हा एकदा ‘गेम चेंजर’ ठरल्याची चर्चा मतदार संघात आहे.

अनेकांच्या सभा गाजल्या

पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर, भाजपचे उमेदवार सुभाष साबणे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. उत्तम इंगोले, जनता दलाचे उमेदवार विवेक केरूरकर यांच्या प्रचारार्थ अनेक मान्यवरांच्या सभा मतदारसंघात गावा गावापर्यंत जाऊन घेण्यात आल्या. पालकमंत्री अशोक चव्हाण, राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते मल्लीकर्जून खर्गे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भगवंत खुबा, डॉ. भागवत कराड, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार गोपीचंद पडळकर, ॲड. प्रकाश आंबेडकर, प्रा. सुशीला मोराळे यांच्या सभा घेण्यात आल्या.

साबणेंचा पराभव हेच लक्ष्य

शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश करून देगलूर - बिलोली विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची उमेदवारी मिळवलेले माजी आमदार सुभाष साबणे यांचा पराभव गेल्या २०१९ च्या निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतरही त्यांनी पक्षांतर करून पुन्हा भाजपतर्फे निवडणूक रिंगणात उतरले. त्यामुळे पुन्हा एकदा सुभाष साबणे यांना कोणत्याही परिस्थितीत हरवण्याचे लक्ष्य महाविकास आघाडीसह अनेक संघटनांनी व विरोधकांनी केले होते. त्यामुळे भाजपने प्रभावी प्रचार यंत्रणा राबवली असली तरी साबणे यांना रोषाला बळी पडावे लागले.

महाविकास आघाडीची प्रभावी यंत्रणा

या पोटनिवडणुकीमध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपने प्रचार यंत्रणा राबविली होती. मात्र त्याहीपेक्षा प्रभावी व नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी या मतदारसंघात राबविली. सध्या निवडणुकांना जातीय रंग येत असल्यामुळे पालकमंत्र्यांनी बिलोली तालुक्यातील राजकारणाचा अभ्यास करून नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील महत्त्वाच्या प्रमुख व्यक्तींना पाचारण करून प्रत्येक गावापर्यंत त्या-त्या पदाधिकाऱ्यांना पाठवून मतदारांची मने वळविली. नांदेड जिल्हा परिषदेतील महत्त्वाचे पदाधिकारी तसेच नांदेड महापालिकेतील काही नगरसेवकांनी गावातील प्रत्येक गल्लोगल्ली फिरून काँग्रेसची प्रचार यंत्रणा मजबूत केली. त्यामुळे ही जमेची बाजू ठरली.

देगलूर पोटनिवडणूक

फेरीनिहाय प्रमुख उमेदवारांना पडलेली मते

पहिली फेरी

 काँग्रेस - जितेश अंतापूरकर - ४,२१६

 भाजप - सुभाष साबणे - २,५९२

 वंचित - डॉ. उत्तम इंगोले - ३२०

तिसरी फेरी

 काँग्रेस - जितेश अंतापूरकर - १०,७१२

 भाजप - सुभाष साबणे - ७,४४८

 वंचित - डॉ. उत्तम इंगोले - ८७३

चौथी फेरी

 काँग्रेस - जितेश अंतापूरकर - १४,५००

 भाजप - सुभाष साबणे - ९,९४३

 वंचित - डॉ. उत्तम इंगोले - १,२२५

सहावी फेरी

 काँग्रेस - जितेश अंतापूरकर - २२,३३२

 भाजप - सुभाष साबणे - १४,५६४

 वंचित - डॉ. उत्तम इंगोले - १,८३८

सातवी फेरी

 काँग्रेस - जितेश अंतापूरकर - २५,३७६

 भाजप - सुभाष साबणे - १७,१६४

 वंचित - डॉ. उत्तम इंगोले - २,२८७

नववी फेरी

 काँग्रेस - जितेश अंतापूरकर - ३३,०६८

 भाजप - सुभाष साबणे - २२,४८६

 वंचित - डॉ. उत्तम इंगोले - ३,०२२

१२ वी फेरी

 काँग्रेस - जितेश अंतापूरकर - ४४, ३४४

 भाजप - सुभाष साबणे - ३०, १६९

 वंचित - डॉ. उत्तम इंगोले - ४, ४६४

१५ वी फेरी

 काँग्रेस - जितेश अंतापूरकर ५६, ४०९

 भाजप - सुभाष साबणे - ३७, २२९

 वंचित - डॉ. उत्तम इंगोले - ५,७९४

१७ वी फेरी

 काँग्रेस - जितेश अंतापूरकर - ६३,५३७

 भाजप - सुभाष साबणे - ४०,८३५

 वंचित - डॉ. उत्तम इंगोले - ६,९५३

२० वी फेरी

 काँग्रेस - जितेश अंतापूरकर- ७४, ८२१

 भाजप - सुभाष साबणे - ४७, ०५८

 वंचित - डॉ. उत्तम इंगोले - ८,०१९

२२ वी फेरी

 काँग्रेस - जितेश अंतापूरकर- ८२,६९०

 भाजप - सुभाष साबणे - ५०,५१८

 वंचित - डॉ. उत्तम इंगोले - ९,१९१

२३ वी फेरी

 काँग्रेस - जितेश अंतापूरकर - ८६, ८५०

 भाजप - सुभाष साबणे - ५२,४२५

 वंचित - डॉ. उत्तम इंगोले - ९,८४१

२४ वी फेरी

 काँग्रेस - जितेश अंतापूरकर - ९०,४२१

 भाजप - सुभाष साबणे - ५४,६२६

 वंचित - डॉ. उत्तम इंगोले - १०,२०१

२५ वी फेरी

 काँग्रेस - जितेश अंतापूरकर - ९४,२२१

 भाजप - सुभाष साबणे - ५६,९५९

 वंचित - डॉ. उत्तम इंगोले - १०,३८९

२६ वी फेरी

 काँग्रेस - जितेश अंतापूरकर - ९७,१५७

 भाजप - सुभाष साबणे - ५९,०३१

 वंचित - डॉ. उत्तम इंगोले - १०,४६६

२७ वी फेरी

 काँग्रेस - जितेश अंतापूरकर - १,००,७७३

 भाजप - सुभाष साबणे - ६१,३५४

 वंचित - डॉ. उत्तम इंगोले - १०,६६३

२८ वी फेरी

 काँग्रेस - जितेश अंतापूरकर - १,०४,३७३

 भाजप - सुभाष साबणे - ६३,४१४

 वंचित - डॉ. उत्तम इंगोले - १०,९०८

२९ वी फेरी

 काँग्रेस - जितेश अंतापूरकर - १,०७,३२९

 भाजप - सुभाष साबणे - ६५,७७२

 वंचित - उत्तम इंगोले - ११,०९७

३० फेरी

 काँग्रेस - जितेश अंतापूरकर - १,०८,७८९

 भाजप - सुभाष साबणे - ६६,८७२

 वंचित - डॉ. उत्तम इंगोले - ११,३४७

(महाविकास आघाडीचे कॉँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर हे ४१ हजार ९१७ मतांनी विजयी झाले.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.