Nanded : उपमुख्यमंत्री फडणवीस आणि खासदार चिखलीकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट; पावडेवाडी नगरपंचायतीसाठी हिरवा झेंडा!

खासदार चिखलीकर यांना तुम्ही मुंबईत थांबा. तुम्हाला सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घडवून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिले.
Nanded
NandedSakal
Updated on

नांदेड - नांदेड शहराचा झपाट्याने होत असलेला नागरी विस्तार हाच पावडेवाडी नगरपंचायतच्या निर्मितीचे उगमस्थान ठरले आहे. नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली पावडेवाडीच्या लोकप्रतिनिधीचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी (ता. १७) मुंबईत भेटले असून त्यांनी नगरपंचायतच्या निर्मितीस हिरवी झेंडी दाखवली आहे.

खासदार चिखलीकर यांच्यासह पावडेवाडी ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी नांदेड उत्तर विधानसभा निवडणुक प्रमुख मिलिंद देशमुख, संभाजीराव उर्फ तात्या पावडे, बंडू पावडे, प्रतापराव पावडे, बापुराव उर्फ बंडू पावडे, हरीभाऊ पावडे, जिल्हा प्रवक्ते प्रल्हाद उमाटे आदी पदाधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या विधान भवनातील दालनात भेट घेतली.

Nanded
Nanded : कोणत्याही अकॅडमीकडे एकही दिवस क्लासेस न करता वंदना गिरी बनल्या पोलिस उपनिरीक्षक

पावडेवाडी ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढली आहे. ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र नांदेड शहराचे मध्यवर्ती ठिकाण व्यापले आहे. नागरिकांना मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामपंचायतची यंत्रणा तोकडी पडत आहे. त्यामुळे नागरिकांना रस्ते, पाणी, मलनिःसारण, वीज यासारख्या मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पावडेवाडी ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Nanded
Nanded News : शिष्यवृत्ती परीक्षेत नांदेडचे यश; राज्य गुणवत्ता यादीत २५ विद्यार्थी चमकले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावडेवाडी शिष्टमंडळाच्या मागणीचा गांभीर्याने विचार करुन नगरपंचायतच्या निर्मितीस हिरवी झेंडी दाखवली. खासदार चिखलीकर यांना तुम्ही मुंबईत थांबा. तुम्हाला सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घडवून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिले.

मंगळवारी दुपारी उपमुख्यमंत्री फडणवीस आणि खासदार चिखलीकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली असता मुख्यमंत्र्यांनी पावडेवाडी नगरपंचायतच्या निर्मितीस तत्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळे पावडेवाडीच्या निर्मितीस प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे.

Nanded
Nanded News : अर्धापूर, मुदखेड व भोकर या तीन तालुक्यातील विजेच्या अडचणी तत्काळ सोडवा; अशोक चव्हाण

राज्यातील शिवसेना - भाजपा - राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या ट्रीपल इंजीनच्या गतीमान सरकारपुढे पावडेवाडी नगरपंचायतच्या निर्मितीचा प्रस्ताव सादर करताच त्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळे नगरपंचायतच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला असल्याचा दावा खासदार चिखलीकर यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()