नांदेड जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी शुक्रवारी १७७ कोरोनाबाधित

२४२ झाले बरे; एक हजार ९९७ रुग्णांवर उपचार सुरू
Corona
Coronasakal
Updated on

नांदेड जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी शुक्रवारी १७७ कोरोनाबाधित

२४२ झाले बरे; एक हजार ९९७ रुग्णांवर उपचार सुरू

नांदेड : जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहेत. शुक्रवारी (ता.चार) प्राप्त झालेल्या एक हजार ७४९ अहवालापैकी १७७ अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या एक लाख दोन हजार २३३ एवढी झाली असून यातील ९७ हजार ५५७ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला एक हजार ९९७ रुग्ण उपचार घेत असून यात सहा बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे लातूर जिल्ह्यातील जळकोट येथील ८० वर्षाच्या एका महिलेचा, खासगी रुग्णालयात श्रीनगर नांदेड येथील ६३ वर्षाच्या एका महिलेचा गुरुवारी (ता.तीन) उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६७९ एवढी आहे.

Corona
गोळीबाराने भिंतीची चाळण आणि गवतात काडतुसं... दोघांना कंठस्नान

आजच्या बाधितांमध्ये नांदेड मनपा १०५, नांदेड ग्रामीण १३, हदगाव दोन, मुदखेड एक, हिमायतनगर सहा, लोहा चार, उमरी दोन, उत्तर प्रदेश दोन, लातूर एक, परभणी चार, पंजाब एक, दिल्ली एक, अर्धापूर एक, कंधार एक, मुखेड चार, नायगाव दोन, वाशीम दोन, मुंबई एक, औरंगाबाद एक, देगलूर चार, किनवट १३, हिंगोली चार, जालना एक व अकोला एक असे एकूण १७७ कोरोना बाधित आढळले आहेत.

Corona
अभ्यासाचा तणाव बेतला जीवावर... १८ वर्षांच्या तरुणीने घेतला गळफास!

आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी एक, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण १९७, देगलूर कोविड रुग्णालय चार, खाजगी रुग्णालय पाच, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ३५ असे एकूण २४२ कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी ३०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड एक, देगलूर कोविड रुग्णालय तीन, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण एक हजार १६१, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ७६९, खासगी रुग्णालय ३३ असे एकूण एक हजार ९९७ व्यक्ती उपचार घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.