नांदेड जिल्ह्यात ५४ हजार टन खताचा साठा

कृषी विभागाचे खरेदीचे आवाहन : दरवाढीसह टंचाईची शक्यता
नांदेड जिल्ह्यात ५४ हजार टन खताचा साठा
नांदेड जिल्ह्यात ५४ हजार टन खताचा साठाsakal
Updated on

नांदेड : जिल्ह्यात सध्या विविध कंपन्याचा ५४ हजार ५२६ मेट्रीक टन रासायणीक खताचा साठा शिल्लक आहे. आगामी काळात खताची दरवाढ तसेच टंचाईची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक असलेले खत सध्या खरेदी करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून केले आहे.

जिल्ह्यात हंगामी पिकांसह बागायती तसेच फळपिकांसाठी मोठ्या प्रमाणात रासायणिक खतांचा वापर होतो. मागील चार वर्षात दरवर्षी दोन लाख टन खताची आवश्यकता जिल्ह्यात असते. या दृष्टीने कृषी विभाग तयारी करतो. खरिप हंगाम २०२२-२०२३ साठी जिल्ह्याला दोन लाख ६७ हजार ७०० टन खताची आवश्यकता भासणार आहे. तशी मागणीही कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे. खताच्या नियोजनाबाबत लातूर विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी नांदेडला नुकतीच बेठक घेवून संबधीतांना नियोजन करण्याचे निर्देश दिले. तसेच शेतकर्‍यांना खताची टंचाई जाणवणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले.

जिल्ह्यात मागील हंगाम तसेच जानेवारीनंतर खताचा पुरवठा झाला आहे. सध्या जिल्ह्यात विविध कंपन्यांची ५४ हजार ५२६ टन खते शिल्लक आहेत. यात डिएपी २५९६ टन, युरीया २० हजार ३३ अन, एमओपी १४५९ टन, एनपीके १५ हजार ५४२ टन, एसएसपी १४ हजार ८०४ टर, कंपोस्ट ८८ टन खताचा समावेश आहे. आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारात खताचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

यामुळे दरवाढ होईल, असे जाणकारांचे मत आहे. यातून टंचाई निर्माण होवू नये यासाठी शेतकऱ्यांनी शिल्लक साठ्यातून खतांची खरेदी करावी. शिल्लक साठा संपल्यानंतर खताची मागणी करण्यासाठी सोईचे होईल, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.