नांदेड : विद्यापीठ ऑफलाइन परीक्षावर ठाम !

स्वारातीम विद्यापीठात बहुपर्यायी प्रश्न परीक्षेसाठी आंदोलन : जाणकारांचा मागोवा
offline Exam
offline Examsakal
Updated on

नवीन नांदेड : पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन परीक्षेत दीर्घ, लघु उत्तरांच्या प्रश्नांऐवजी बहुपर्यायी प्रश्न आले होते. हा कोरोनाकाळातील एक पर्याय होता. ही व्यवस्था कायमस्वरूपी राबवू शकत नाही. ऑफलाइन परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका सोडविण्याचा कालावधी साधारणत: तीन तासांचा होता तो ऑनलाइनमध्ये एक तासावर आला होता. आता पूर्वपदावर महाविद्यालये आले. परीक्षा ऑफलाइन पेन व पेपर पद्धतीने दीर्घोत्तरी प्रश्नपत्रिकाद्वारे विद्यापीठाच्या परीक्षा होत आहेत. अशावेळी या परीक्षांना विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांचा वाढता तीव्र विरोध आहे. बहुपर्यायी निवड प्रश्न परीक्षा पद्धतीसाठी विद्यार्थां व संघटनानी दोनदा आंदोलन करत विद्यार्थ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘स्वारातीम’ विद्यापीठाने पारंपरिक पद्धतीने ऑफलाइन परीक्षा होतील असे सांगितले आहे. दरम्यान याच क्षेत्रातील जानकारांनी या विषयी आपली भूमिका मांडली आहे.

बहूपर्यायी प्रश्न परिक्षा ही पेंडमिक काळातील तात्पुरती व्यवस्था होती. विद्यार्थ्यांचे वर्षभराचे शैक्षणीक मुल्यमापन हे पेन पेपर पध्दतीने विद्यापीठामार्फत नियमीत केले जाते. त्याद्वारे विद्यार्थी आपली बुध्दीमत्ता परिक्षेच्या माध्यमांतुन सिध्द् करत असतो. एखादा पदवी अभ्यासक्रम व परिक्षा पध्दती ठरवण्यासाठी विविध प्राधीकरणांचे टप्पे असतात. अभ्यासमंडळात अभ्यासक्रम तयार केला जातो, त्या त्या विद्याशाखेत प्रश्नपत्रीकेचे स्वरुप अंतीम करते व विद्यापरिषदेत ह्या सर्वांना मान्यता देते. परिक्षा वेळापत्रक व सबंधीत विषयावर परिक्षा मंडळ निर्णय घेते.

बहूपर्यायी प्रश्न पध्दती परिक्षा केवळ लॉकडाऊनमुळे झाल्या आहेत. तसा निर्णय राज्यात सर्वच विद्यापीठात शासन आदेशान्वये झालेला होता. स्वारातीम विद्यापीठाने मागील काही वर्षापूर्वी अशी परिक्षा पध्दती राबवली होती त्याचे परिणाम चांगले न मिळाल्यामुळे ही पध्दत बंद केली आहे. मागील शैक्षणीक वर्ष म्हणावे तितके सुरळीत झालेले नाही. एस.टी.संपाचा व मे पर्यंत लांबलेले शैक्षणीक वर्षाचा परिणाम विद्यार्थी उपस्थीतीवर झाला. काही विद्यापीठात बहू पर्यायी प्रश्न पध्दतीने परिक्षा झालेल्या आहेत, तशीच मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. काही पदवी परिक्षा संपत आलेल्या आहे व काही सुरुवात होणार आहेत, अशा वेळी उर्वरीत पदवी व पदव्युत्तर परिक्षांसाठी वेगवेगळ्या परिक्षा पध्दती विद्यापीठाला राबवता येतील का? हाही प्रश्न आहे.

- प्रो.सूर्यकांत जोगदंड, सचिव स्वामुक्टा प्राध्यापक संघटना, सदस्य सिनेट.

उन्हाळी २०२२ परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाने एक महिना अगोदर प्रकाशित केले होते. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी ऑनलाइन, ऑफलाइन अशा संमिश्र पद्धतीचा वापर करून नियोजित अभ्यासक्रम वेळेत पूर्ण केलेला आहे. पारंपारिक विश्लेषक पद्धतीचा अवलंब करणे शिक्षणाचा दर्जा टिकविण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे म्हणून विद्यापीठाने हा निर्णय घेतलेला आहे. या सर्व बाबींचा विचार करता विद्यार्थी संघटना व विद्यार्थ्यांनी संयमाने परीक्षेला सामोरे जाणे त्यांच्यासाठी फायद्याचे आहे. परीक्षा वेळेत संपून निकाल जाहीर झाल्यास पुढील शैक्षणिक वाटचालीचा मार्ग सुकर होईल. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचे निकाल वेळेत जाहीर झाल्यास पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश दरम्यान होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यास मदत होणार आहे.

- डॉ. अजय क्षीरसागर (प्राचार्य), डी.के. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी

पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रम लक्षात घेता विद्यार्थांचा सर्वांगीण विकास हा त्यांच्या विविध कौशल्या वरती अवलंबून आहे. आणि हे कौशल्य निर्माण करण्यासाठी सखोल अभ्यास महत्वाचा ठरतो. आणि असा अभ्यास केल्यानंतर फक्त काही वेळातच एमसीक्यु परीक्षा पद्धत वापरुन गुणवत्ता ठरवता येत नाही.

- प्रा. सुनील हंबर्डे, इंदिरा इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट.

पदवी, पदव्युत्तर सेमिस्टर परिक्षा गत दोन वर्षात ऑनलाईनने घेण्यात आल्या. यामध्ये वर्ग तासिका ऑनलाईन आणि परिक्षा ऑफलाईन अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. विद्यार्थ्यांची एमसीक्यू पद्धतीने परिक्षा घेण्याची मागणी रास्त आहे. परंतु हजारो विद्यार्थ्यांच्या एमसीक्यु पद्धतीने उत्तरपत्रिका आठवडाभरात विद्यापीठ प्रशासनास छपाई करणे अशक्य बाब आहे. वास्तविकता नव्याने परिक्षा नियंत्रक रुजू झाल्याने विद्यापीठ प्रशासन व विद्यार्थी यांच्यामध्ये समव्याचा अभाव दिसून येत आहे. तसेच परिक्षा तारखेच्या ३० दिवस आगोदर विद्यापीठ परिक्षा विभागाने परिक्षा कोणत्या पद्धतीने होणार आहेत. याची कल्पना विद्यार्थ्यांना देणे गरजेचे होते.

- प्रा. राजू सोनसळे, विद्यार्थी नेता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.