जिल्हा परिषद नांदेड
जिल्हा परिषद नांदेड

नांदेड : अवघड क्षेत्रातील निकष पात्र शाळा अपात्र; शिक्षणाधिकाऱ्यांची मनमानी

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी दरवर्षी अवघड क्षेत्रातील शाळांची निवड करण्यात येते.
Published on

नांदेड ः दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी दरवर्षी अवघड क्षेत्रातील शाळांची निवड करण्यात येते. परंतु, यंदा अवघड क्षेत्राच्या निकषात पात्र ठरणाऱ्या जिल्हा परिषदेच्या (Nanded jilha parishad) अनेक शाळा अवघड क्षेत्रातून अपात्र ठरविण्यात आल्या आहेत. यामुळे प्राथमीक शिक्षणाधिकाऱ्यांचा (Primary education office) कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

शासन निर्णयानुसार 2021च्या आॅनलाइन बदली धोरणात दर तीन वर्षांनी अवघड क्षेत्रातील शाळा ज्या निवडलेल्या होत्या, त्या आता शासन निर्णयात निवडीसाठी सात निकष दिले आहेत. या निकषापैकी जी शाळा शाळा डोंगरात असेल, आदिवासी क्षेत्रात असेल तसेच आॅनलाईन सेवा नसेल हे तीन निकष पुर्ण करत असेल त्या शाळेला अवघड क्षेत्र म्हणून घोषीत करायचे आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकाऱ्यांनी किनवट व माहूर तालुक्यात दौरे करुन काही शाळा व तेथील परिस्थिती पाहून क्षेत्रभेट केली. यावेळी कोणावरही अन्याय होणार नाही, असे आश्वासन दिले. परंतु, फक्त 48 शाळा अवघड क्षेत्र म्हणून घोषीत करुन तोंडाला पाने पुसली आहेत. विशेष म्हणजे गतवर्षी जिल्ह्यातील 209 शाळा अवघड क्षेत्रात पात्र ठरवले असताना यावर्षी त्यात घट कशी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा - सेलूतील लोअर दूधनाचे मॅनेजमेंट सबडिविझन आॅफिस आले मोडकळीस

संबंधित तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांना आदेश देऊन या शाळांची गणना करुन नोंद करावी. मात्र किनवट व माहूर तालुक्यातील अनेक शाळा आहेत की, त्या शासन निर्णयानुसार चार ते पाच निकषात बसत आहेत. असे असतानाही त्या पात्र शाळा वगळून अपात्र ठरविण्यात आल्या आहेत. हा प्रकार म्हणजे शिक्षणाधिकारी यांची मनमानीच आहे, असा आरोप शिक्षक संघटनांमधून होत आहे.

निवड समितीला ठेवले अंधारात

दरवर्षी अवघड क्षेत्रातील शाळांची निवड करताना निवड समितीला विश्वासात घेतले जाते. परंतु, यावर्षी निवड समितीला अंधारात ठेवून अवघड क्षेत्रातील शाळा पात्र ठरवल्याची माहिती सुत्रांनी दिली. विशेष म्हणजे ज्या शाळा अवघडमध्ये येतात त्यांची कागदपत्रेसुद्धा घ्यायला शिक्षण विभाग तयार नसून वेगवेगळी उत्तरे शिक्षण विभागातून देण्यात येत आहे.

पुनर्तपासणी करुन शाळा जाहीर कराव्यात

प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांनी 48 शाळांच्या यादीला मंजुरी दिली. सदर यादी स्थगीत करुन किनवट, माहूर तालुका व जिल्ह्यातील ज्या शाळा निकषात बसत आहेत त्यांची पुनर्तपासणी करुन अवघड क्षेत्रातील शाळा जाहीर कराव्यात. अन्यथा शिक्षणाधिकाऱ्यांच्या कारभाराविरुद्ध आवाज उठविण्यात येईल.

- संतोष अंबुलगेकर, जिल्हाध्यक्ष शिक्षक सेना

असे आहेत अवघड क्षेत्रातील शाळांचे निकष

- नक्षलग्रस्त- पेसा गाव क्षेत्रात असणारे गाव

- वार्षिक सरासरी पर्जन्यमान दोन हजार मिलीमिटरपेक्षा जास्त किंवा नैसर्गिक आपत्तीने सातत्याने संपर्क तुटणारे गाव

- हिंस्त्र वन्य प्राण्यांचा उपद्रव असणारा जंगलव्याप्त प्रदेश

- वाहतुकिच्या सुविधांचा अभाव असणारे गाव

- संवाद छायेचा प्रदेश

- डोंगरी भाग प्रदेश

- राष्ट्रीय राज्य महामार्गापासून 10 किलोमिटरपेक्षा जास्त दूर

संपादन- प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()