नांदेड - ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना २०२४ पर्यंत हर घर, नल से जल या योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे दिली आहे. या योजनेमध्ये प्रतिदिन एकाव्यक्तीस किमान ५५ लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे. यापूर्वी अस्तित्वातील ४० लिटरप्रमाणे पाणी उपलब्ध असणाऱ्या जुन्या योजनादेखील आता ५५ लिटर प्रतिमाणसी प्रतिदिवस योजनेमध्ये परिवर्तित होणार आहेत.
भोकर तालुक्यातील चितगीरी येथे शुक्रवारी (ता. २०) श्रीमती ठाकुर यांनी पाणी पुरवठा योजना व नळ जोडणीच्या कामांची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्या बोलत होत्या. पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप इंगोले, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. भुपेंद्र बोधनकर, गट विकास अधिकारी जी. एल. रामोड, पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता सरनाईक आदींची उपस्थिती होती.
देखभाल दुरुस्ती ग्रामपंचायत लोकसहभागातून
पुढे त्या म्हणाल्या, सर्व शाळा, अंगणवाड्या यांनादेखील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देण्याचे उद्दिष्ट या मिशनमध्ये निश्चित करण्यात आलेले आहे. प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला त्यांच्या घराजवळ नळजोडणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पाणीपुरवठा शाश्वत व्हावा, यासाठी आवश्यक सर्व उपाययोजनांची पूर्तता करण्यात यावी. तसेच सांडपाणी व्यवस्थापनासाठी उपाययोजना करणे व देखभाल दुरुस्ती ग्रामपंचायतच्या माध्यमातून तसेच लोकसहभागातून करण्यात यावी.
६६ हजार ७५२ नळ जोडणीचे उद्दिष्ट
प्रारंभी त्यांनी नळ जोडणी, विंधन विहिरींची पाहणी केली. गृहभेटीव्दारे महिलांशी संवाद साधला. त्यानंतर जिल्हयात सुरु असलेल्या पशू आधार नोंदणी संदर्भात पशुधन पालकांची भेट घेऊन आधार नोंदणी करण्याविषयी सूचना दिल्या जिल्हयात सन २०२० -२१ साठी वैयक्तिक नळ जोडणीसाठी एक लाख ६६ हजार ७५२ उद्दिष्ट देण्यात आले असून त्यापैकी ९८ हजार १६५ नळ जोडणी दिलेल्या कुटुंबांचे ऑनलाईन करण्यात आलेले आहे. आता उर्वरीत नळ जोडणीसाठी नियोजन करुन तात्काळ झालेल्या कामांचे ऑनलाईन करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहेत. यावेळी त्यांनी भोकर पंचायत समिती सभागृहात पंचायत समितीतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेवून योजनांचा आढावा घेतला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.