नांदेड : वेळीच करा सोयाबीनवरील खोडमाशीचे व्यवस्थापन

कृषी कीटकशास्त्रज्ञांचे शेतकऱ्यांना आवाहन : एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा
Nanded farmer soybean crop pest management
Nanded farmer soybean crop pest management
Updated on

नांदेड : मराठवाड्यातील सोयाबीन सर्वात महत्वाचे नगदी पीक असून शेतकऱ्यांची आर्थिक सुधारणा या पिकाच्या उत्पादनावर अवलंबुन आहे. या वर्षी बऱ्याच ठिकाणी पावसाच्या उशीराच्या आगमनाने पेरणीस उशीर झाला होता. तसेच जुलै महिन्यातील व ऑगष्टच्या पहिल्या आठवड्यात होणारा सततचा रिमझीम पाउस, तसेच ढगाळ वातावरणामुळे सोयाबिन पिकावर खोडमाशी या किडीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. खोडमाशीमुळे जवळपास ५० टक्के पर्यंत सोयाबीनच्या उत्पादनात घट येऊ शकते. त्यामुळे शेतकरी बंधुनी वेळीच जागरूक राहून एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा असे आवाहन वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील कृषी कीटकशास्त्रज्ञ प्रा. डॉ. पी.एस. नेहरकर, डॉ. ए.जी. लाड, डॉ. राजरतन खंदारे, डॉ. योगेश मात्रे यांनी केले आहे.

खोडमाशीचा प्रादुर्भाव सोयाबीनची उगवण झाल्यापासून कधीही होऊ शकतो. पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत जर झाडाचा शेंडा सुकून खाली झुकलेला आढळला तर त्यावर खोडमांशीचा प्रादुर्भाव झाला असण्याची दाट शक्यता असते. अळी पान पोखरुन शिरेपर्यंत पोहचून शिरेतुन पानाच्या देठामध्ये शिरते व शेंडा मधोमध कापल्यास आत मध्ये लहान पिवळी, तोंडाच्या बाजूने टोकदार, मागच्या बाजूने गोलाकार व पाय नसलेली अळी जमिनीच्या बाजूने डोके करुन म्हणजेच खालच्या दिशेने खोड पोखरत जात असलेली दिसते.

रोप मोठे झाल्यावर या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास मात्र तो लवकर लक्षात येत नाही व शेवटी फक्त प्रौढ माशी निघून छिद्र फांदीच्या खोडाजवळील बाजूस दिसते. बऱ्याचदा झाड शेवटपर्यंत हिरवे राहते परंतु शेंगा भरत नाहीत. वेळीच उपाययोजना न केल्यास ५० टक्के पर्यंत उत्पादनात घट येउ शकते.

असे करा व्यवस्थापन

  • सोयाबीन पिकांचे वेळोवेळी कीड व रोगांसाठी निरीक्षण आणि सर्वेक्षण करावे.

  • पीक तणमुक्त ठेवावे.

  • खोडमाशी प्रादुर्भावग्रस्त वाळलेल्या फांद्या, झाडे यातील किडीसह नष्ट कराव्यात.

  • पाच टक्के निंबोळी अर्क ५० मिली १० लिटर पाण्यातून प्रतिबंधात्मक फवारणी करावी.

  • किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतरच रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा.

  • आर्थिक नुकसान पातळी : १० ते १५ टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()