नांदेड - जिल्ह्यात मागील काही वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पंतप्रधान पीक विमा योजनेत विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. सहा पिकांसाठी तब्बल दहा लाख ५९ हजार ५०९ अर्ज शेतकऱ्यांनी दाखल केले आहेत. त्यात शेतकऱ्यांनी ६८ कोटी ५५ लाख रुपयांचा विमा हप्ता भरल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.
जिल्ह्यात पंतप्रधान खरीप हंगाम २०२२ पीक विमा योजना युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनीद्वारे राबविण्यात आली. या योजनेतंर्गत ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, उडीद व मुग या पिकासाठी पिक विमा भरण्याची अंतिम तारीख एक ऑगस्टपर्यंत होती. यंदा शेतकऱ्यांनी विमा भरण्यासाठी अंतिम तारखेची वाट न पाहता वेळेवर विमा भरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आणि जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले होते.
दरम्यान, मागील वर्षी जिल्ह्यात नऊ लाख ११ हजार ४०६ अर्ज दाखल झाले होते. यंदा मात्र मागील पाच वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक दहा लाख ५९ हजार ५०९ अर्ज शेतकऱ्यांनी दाखल केले आहेत. यात शेतकऱ्यांनी सहा लाख २३ हजार ७५६ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षीत केले आहे. यात तीन हजार २५६ कोटी विमा संरक्षीत रक्कम निर्धारीत केली आहे. यासाठी ६८ कोटी ५५ लाख रुपयांचा विमा हप्ता शेतकर्यांनी भरला आहे. विमा कंपनीकडे केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी हिस्सा २७८ कोटी जमा होणार आहे. यानुसार एकूण विमा हप्ता ६२५ कोटी ५७ कोटी रुपये विमा हप्ता जमा होणार आहे.
मागील वर्षी सहभागी अर्जदार - ९,११,४०६
यंदा सहभागी अर्जदार शेतकरी - १०,५९,५०९
शेतकऱ्यांनी भरलेला विमा हप्ता - ६८ कोटी ५५ लाख
केंद्र व राज्य सरकार विमा हप्ता - ५५७ कोटी
जिल्ह्यातील विमा संरक्षीत क्षेत्र - ६,२३,७५६ हेक्टर
एकूण विमा संरक्षीत रक्कम - ३२५६ कोटी रुपये
एकूण विमा हप्ता जमा - ६२५ कोटी ५७ लाख रुपये
पंतप्रधान खरिप पिकविमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी जिल्हा प्रशासनासह कृषी विभागाकडून वेळोवेळी आवाहन करण्यात आले होते. यानुसार यंदा मागील काही वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यात सर्वाधिक दहा लाख साठ हजार अर्जदार शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग घेतला आहे.
- रवीशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.