Nanded : ‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने सर्वसामान्यांनी व्यक्त केल्या भावना

हाताला काम, शेतमालाला दाम अन् जीवन मरणाचे प्रश्न सुटावेत
Bharat Jodo Yatra Maharashtra
Bharat Jodo Yatra Maharashtraesakal
Updated on

अर्धापूर : पदवी घेऊन नौकरीसाठी रोज भटकंती करावी लागत आहे. कष्टाने पिकविलेल्या शेतमालाला भाव मिळत नाही, महिन्यात कमावलेला पैसे महागाई फस्त करित आहे, सामाजिक सौहार्द टिकून बंधुभाव एकात्मता निर्माण झाली तर रोजचे जीवन मरनाचे प्रश्न सुटले तर जीवन सुसह्य होईल अशा भावना ‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांना व्यक्त केल्या आहेत.

Bharat Jodo Yatra Maharashtra
Nanded : भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेत्याचं निधन

भारत जोडो यात्रेबद्दल शहरी भागांसह ग्रामीण भागात खुप मोठी उत्सुकता निर्माण झाली असून काही आशा निर्माण झाल्या आहेत.देशातील निर्माण झालेली कटुता संपावी, देशातील एकामत्मता, अखंडतता व बंधुभाव अबाधित रहावा, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठीव बेरोजगारी, महागाई, यांसह इतर महत्त्वाच्या प्रश्नावर केंद्रातील एनडीए सरकारला जाब विचारण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी येथून सुरू केलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेचे नांदेड जिल्ह्यात उत्साहात स्वागत करण्यात आले आहे.

Bharat Jodo Yatra Maharashtra
Nanded : भारत जोडो निमित्ताने खड्डे जोडो!

यात्रेची माहिती विविध माध्यमांतून घरोघरी पोहचली आहे. या यात्रेबद्दलचे कुतुहल, उत्साह सोबतच काही आशा ही निर्माण झाल्या आहेत. तसेच दुभंगलेल्या नागरिकांना एकत्र जोडण्यासाठी ही यात्रा जोडणारी ठरेल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.

Bharat Jodo Yatra Maharashtra
Nanded : भारत जोडोच्या निमित्ताने नांदेडमध्ये मोठी लगबग... वरिष्ठ नेते मंडळी शहरात दाखल

वाढती महागाईवर सडेतोड उत्तर

शारदा साखरे : आमच्या गृहणीचे आर्थिक बजेट वाढती महागाई फस्त करित आहे. गॅस, किरणा आदी जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. महागाईमुळे आमचा जीव मेटाकुटीला येतो.

Bharat Jodo Yatra Maharashtra
Nanded : नेत्याच्या यात्रेमुळे अखेर रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागला

रोजगार मिळविण्यासाठी फायद्याची

संभाजी शेटे : जीवाचे रान करून आम्ही उच्च शिक्षण घेतले. शिक्षणावर खूप मोठा खर्च झाला. शिक्षण घेऊन काही कामधंदा मिळेल, नोकरी मिळेल अशी आशा होती. पण झाले उलटेच. हातात पदव्या घेऊन नोकरीसाठी भटकंती करावी लागत आहे. दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असे आश्वासन देण्यात आले. पण नोकरी मिळाली नाही, व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे.

Bharat Jodo Yatra Maharashtra
Nanded : चोरट्यांची दिवाळी झाली जोरात

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी उपयोगी

दिगांबर पाटील धुमाळ : शेतमालाला दुप्पट भाव देण्याचे आश्वासन देण्यात आले. भाव दुप्पट मिळणे तर सोडाच उत्पादन खर्च निघणे अवघड झाले आहे. खते, बी बियाणे, किटक नाशकांचे भाव वाढले आहेत.

शेतमालाला दुप्पट भाव देण्याचे आश्वासन हवेत गेले. शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी यात्रेचा उपयोग होईल.

Bharat Jodo Yatra Maharashtra
Nanded : अशोक चव्हाणांच्या पक्षांतर चर्चेला पूर्णविराम

एकसंध समाज निर्माण करण्यासाठी मदत

शेख मकसुद : देशात विविध जाती, पंथ, धर्मांचे लोक राहतात. विविधतेतून एकता साधली गेली आहे. देशातील वातावरण गेल्या काही वर्षात बिघडून गेले आहे. सामाजिक एकतेला तडा जाणाऱ्या अनेक घटना झाल्या आहेत. आशा घटनांमुळे एकतेला बाधा निर्माण होते. हे टाळून एकसंध समाज निर्माण करण्यासाठी या भारत जोडो यात्रेचा फायदा होईल.

Bharat Jodo Yatra Maharashtra
Nanded : माझी सालदारकी संपत आली ; हरिभाऊ बागडे

संविधान व देश वाचविण्यासाठी उपयोगी

आशा सरोदे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील प्रत्येक नागरिकांना घटनात्मक अधिकार दिले आहेत.

संविधानावर देश व लोकशाही टिकून आहे. नागरिकांच्या संविधानात्मक अधिकारांवर गदा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. संविधानात्मक संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केला जात असून तो लोकशाहीसाठी घातक आहे. संविधान व देश वाचविण्यासाठी हि भारत जोडो यात्रा उपयोगी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.