नांदेड : जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्या टप्यात २८२ कोटी ५६ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. या निधीचे मागणीच्या पन्नास टक्क्यानुसार वितरण ता. १० नोव्हेंबर रोजी सर्वच सोळा तालुक्यांना करण्यात आले. परंतु जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या नियोजन शुन्य कारभारमुळे हा निधी संबधीत शेतकऱ्यांना मिळण्यास विलंब लागत आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी अडचणीत आले आहेत.
नांदेड जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या पाच महिन्याच्या कालावधीत अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसामुळे पाच लाख ६४ हजार ५१८ हेक्टरवरील जिरायती व फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते. याबाबत शासनाच्या सुधारीत दरानुसार जिल्ह्यातील पाच लाख ६४ हजार ५१८ हेक्टर बाधीत क्षेत्रासाठी ५६५ कोटी १३ लाख रुपयांचा निधी लागणार आहे. ता. १० नोव्हेंबर रोजी शासनाने २८४ कोटी ५२ लाख रुपयांच्या निधीचा पहिला हप्ता नांदेड जिल्ह्याला मिळाला. जिल्हा प्रशासनाने हा निधी सर्व सोळा तालुक्यांना त्यांच्या मागणीच्या पन्नास टक्क्यानुसार वितरीत केला. तालुकास्तरावरुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या बनवुन जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले. परंतु भरपाइ वाटपाचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. याबाबत जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक अजय कदम यांच्याशी संपर्क केला असता, वाटपाचे काम मध्यवर्तीसह इतर बॅंकांनाही दिले आहे. शेतकऱ्यांची रक्कम टप्याटप्याने बॅंकांना मिळत आहे. हिमायतनगर तालुक्याची रक्कम काल मिळाली. काही ठिकाणी अनुदान वाटपाचे काम सुरु असल्याचे ते म्हणाले.
तालुकानिहाय वितरीत केलेला निधी
नांदेड- १० कोटी ३३ लाख, अर्धापूर - आठ कोटी ५१ लाख, कंधार - २० कोटी ७६ लाख, लोहा - २६ कोटी ३६ लाख, बिलोली - १६ कोटी २० लाख, नायगाव - १९ कोटी १९ लाख, देगलूर - २२ कोटी ४१ लाख, मुखेड - २४ कोटी ४० लाख, भोकर - १९ कोटी ५७ लाख, मुदखेड - सात कोटी २९ लाख, धर्माबाद - १० कोटी २३ लाख, उमरी - १४ कोटी ३७ लाख, हदगाव - ३२ कोटी ८१ लाख, हिमायतनगर - १५ कोटी ९९ लाख, किनवट - २४ कोटी २३ लाख, माहूर - नऊ कोटी ८३ लाख.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.