Nanded : आरोग्य धोक्यात : विनापरवाना दारू विक्रीकडे प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष

शाळकरी मुले करताहेत रसायनमिश्रित शिंदीचे सेवन
Nanded  news
Nanded newsesakal
Updated on

बिलोली : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुर्लक्षामुळे बिलोली शहर व परिसरात ताडी विक्रीच्या नावाखाली सर्रासपणे रसायन मिश्रित शिंदीची व विनापरवाना भेसळयुक्त दारूचे खुलेआम विक्री केली जात आहे. आरोग्यास अपायकारक असलेल्या रसायन मिश्रित शिंदीचे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून तरुण बेरोजगार व शाळकरी मुले याकडे आकर्षिली जात आहेत. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी व संबंधित विभाग प्रमुखांनी याची दखल घेऊन भेसळ युक्त विनापरवाना शिंदी व दारूवर बंदी घालावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Nanded  news
Geyser Precaution Tips : हिवाळ्यात गिझरची सर्व्हिसिंग गरजेची, अन्यथा होऊ शकते मोठी दुर्घटना

बिलोली शहरालगत बडूर मार्गावर मागील वर्षभरापूर्वी एक शिंदीभट्टी कार्यान्वित करण्यात आली आहे. बिलोली तालुक्यातील भोसी, सावळी व परिसरात मागील पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत शुद्ध ताडी काढली जात होती. शुध्द ताडीमुळे मानवी शरीरातील काही अपायकारक आजार बरे होत असल्याची ख्याती आहे. त्यामुळे सुशिक्षित लोकही त्याचे सेवन करत असत. तदनंतर या झाडांची कत्तल झाली व दरम्यानच्या काळात रसायन मिश्रित शिंदी विक्रीचे प्रमाण वाढल्यामुळे पोलिस प्रशासनाकडून रसायन मिश्रित शिंदी तयार करण्याचा मोठा साठा जप्त करून कठोर कारवाई करण्यात आली होती त्यामुळे तालुक्यातील रसायन मिश्रित शिंदीला पूर्णतः आळा बसला होता.

Nanded  news
Parenting Tips : मुलांचा आत्मविश्वास कमी झाला आहे? मग, ‘या’ टीप्सची घ्या मदत

तब्बल एका दशकानंतर बिलोली शहरालगत बडूर रोडवर शिंदी विक्रीची भट्टी उघडण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुर्लक्षामुळे बिलोली शहरासह सीमावर्ती भागात खुलेआम रसायन मिश्रित शिंदीची विक्री होत आहे. बिलोली येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय आहे, मात्र या कार्यालयात एकही कर्मचारी कार्यरत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी उंटावर बसून शेळ्या हाकल्याप्रमाणे महिन्यातून एखादे दिवस हजेरी लावतात व गायब होतात. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस शिंदी दारूचा अवैध व्यवसाय सर्वत्र पसरून सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. याची वरिष्ठांनी दखल घेऊन यावर आळा घालावा अशी मागणी करण्यात येत आहे.

दिवसेंदिवस वाढतोय अवैध व्यवसाय

दुकाने - ०४

किंमत (एक बॉटल) - २० रूपये

रोज विक्री - ४०० लिटर

शिंदी दुकानामुळे नागरिकांना विशेषतः महिला वर्गाला होणाऱ्या त्रासाबद्दल अद्यापही तक्रारी आलेल्या नाहीत मात्र सामाजिक स्वास्थ्य बिघडून त्याचे दूरगामी परिणाम होत असतील तर संबंधिताविरुद्ध तात्काळ कारवाई करू.

- गणेश सोंडारे, पोलिस निरिक्षक, बिलोली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()