नांदेडमध्ये पुन्हा दमदार पाऊस

मराठवाड्यात अन्यत्र रिमझिम; विष्णुपुरी धरणातून विसर्ग
 rain again
rain againsakal
Updated on

औरंगाबाद : मराठवाड्यात दो-तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी रात्री व आज ठिकठिकाणी पाऊस झाला. नांदेडमध्ये दमदार तर औरंगाबादसह अन्य जिल्ह्यांत रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. औरंगाबाद शहरात सायंकाळपर्यंत ९.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

दोन तीन दिवस उघडीप दिलेल्या पावसाचे रविवारी (ता. १७) रात्री नांदेड शहर आणि जिल्ह्यात आगमन झाले. आजही कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता. सकाळी साडेआठला संपलेल्या २४ तासांत सरासरी ३६.४० मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात एक जूनपासून आतापर्यंत एकूण ६२७.९० मिलिमीटर पाऊस झाला आहे. दरम्यान, विष्णुपुरी प्रकल्प ७१ टक्के भरला असून सततच्या पावसामुळे त्याच्या पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे एक दरवाजा मध्यरात्री सव्वाबाराला उघडून ३५१ क्यूमेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात तीन लाख २० हजार ७८९ हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.

लातूर २९ मिमी पाऊस

लातूर जिल्ह्यात सोमवारी (ता. १८) सकाळी आठला संपलेल्या २४ तासांत २९.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३८२.३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तालुकानिहाय गेल्या २४ तासांतील, कंसात आतापर्यंतचा पाऊस मिलिमीटरमध्ये असा ः लातूर ३३.३ (३८७.७), औसा १७.९ (२६७.८), अहमदपूर ४३ (५११.७), निलंगा ३६.७ (२८३.६ ), उदगीर ३० (४६२.८), चाकूर २५.४ (४३६.६ ), रेणापूर ११.६ (३४८.६), देवणी २७.३ (३५६.७), शिरूर अनंतपाळ २३.६ (४१९.९ ), जळकोट ४९.५ (५०६ ). आज दिवसभर वातावरण कोरडे होते.

उस्मानाबादेत संततधार

उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी (ता. १७) रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. आज दिवसभर भीजपाऊस सुरू होता. तुळजापूर, कळंब तालुक्यात चांगला पाऊस झाला असला तरी इतरत्र मात्र तुरळक होता. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात केवळ १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. संततधारेने शहरातील रस्त्यावर चिखल झाला असून ते निसरडे झाले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांना काळजी घ्यावी लागत आहे. पिकांना मात्र हा पाऊस पोषक ठरत आहे.

बीडमध्ये मध्यम सरी

बीड : जिल्ह्यात आज कुठे रिमझिम तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मागच्या आठवड्यात सलग पावसाच्या हजेरीनंतर शुक्रवार - शनिवारी काहीसा खंड होता. त्यामुळे शेतातील आंतरमशागतीची कामे सुरु झाली. आज पुन्हा पावसामुळे दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही.

पिकांत साचले पाणी

नळेगाव ः दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर काल व आज परिसरात जोरदार पाऊस झाला. सततच्या पावसाने पिकांत पाणी साचले असून सोयाबीन, तूर आदी पिके वाया गेल्यासारखी आहेत. यंदा उसाचे क्षेत्र कमी झाल्याने नगदी पीक म्हणून सोयाबीनचा पेरा वाढला आहे. मात्र अनेक शेतांतील सोयाबीन पिवळे पडले आहे.

जिल्ह्यात रिमझिम पाऊस

कयाधू नदीला पूर

आंतरमशागतीची कामे खोळंबली

सततच्या पावसाने पिकांची वाढ खुंटली

गेल्या चोवीस तासांत ३९.२० मिमी पाऊस

जिल्ह्यात सकाळपासून रिमझिम

रविवारी रात्रीही हलका, मध्यम पाऊस

गेल्या २४ तासांत २०.१० मिमी पाऊस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.