Nanded : अतिवृष्टीचा पाऊस, पिकांचे नुकसान; मदतीचे काय?

मात्र अद्याप पर्यंत शासन स्तरावरून अध्यादेश न निघाल्यामुळे शेतकऱ्यांना ही मदत मिळेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली
Nanded
Nanded sakal
Updated on

बिलोली - बिलोली तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात ढगफुटी सदृश्य पावसाने झोडपल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. महसूल विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार शंभर टक्के पिकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण खासदार प्रताप पाटील चिखलीकर आमदार अंतापूरकर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आदींनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली.

Nanded
Nanded: शिवणी परिसरात ढगफुटीसारखा पाऊस

जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार तुषार राठोड माजी आमदार सुभाष साबणे आदी लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

Nanded
Mumbai Crime : दिल्ली-मुंबई इंडिगो फ्लाईटमध्ये प्रवासी महिलेशी लैंगिक अत्याचार प्रकरणी 47 वर्षीय प्राध्यापकाला अटक

त्याबरोबरच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार जितेश अंतापुरकर, आमदार अमर राजूरकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य डॉ. मीनल पाटील खतगावकर त्यांनीही नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. सर्वपक्षीय नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे आसू पुसण्यासाठी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला. मात्र अद्याप पर्यंत शासन स्तरावरून अध्यादेश न निघाल्यामुळे शेतकऱ्यांना ही मदत मिळेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.