नांदेड : राष्ट्रीय महामार्ग सुसाट अन् अंतर्गत रस्ते भुईसपाट

रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण, भूमिपूजन करून प्रश्न ‘जैसे थे’
Nanded internal road construction work bad compared Highway
Nanded internal road construction work bad compared Highwaysakal
Updated on

मालेगाव : मालेगाव हे जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे गाव आहे. या ठिकाणी सर्वच राजकीय पक्षाचे, संघटनेचे पदाधिकारी, पुढारी मोठ्या संख्येने आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघातील गाव आहे. गावाची लोकसंख्या ही पंधरा हजाराच्या जवळपास आहे. गावापासून १५ किमी अंतरावर नांदेड जिल्हा व अर्धापूर, वसमत हे दोन तालुके आहेत. गावातूनच राष्ट्रीय महामार्ग कल्याण-निर्मल जात असल्याने व नांदेडशहरात अंतर्गत रस्ता जात असल्याने हे दोन्ही रस्ते सुसाट झाले. परंतु अंतर्गत रस्ते, पांदण रस्ते मात्र भुईसपाट झाले. अनेक पांदण रस्त्यांना क्रमांकच नाहीत. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने हा भाग विकासापासून वंचितच आहे. त्यामुळे अमृत महोत्सव वर्ष कसे साजरे करावे हा प्रश्न नागरिकांना पडला आहे?

मालेगाव-देगाव कुराडा शिव रस्त्यावरील मातीचा पूल मागील तीन-चार वर्षापूर्वी पावसाळ्यात वाहून गेला त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी अडचण झाली. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी, तहसीलदार, जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, आमदार याकडे निवेदने दिली त्याचा सतत पाठपुरावा केला. दोन वर्षानंतर सदर पुलासाठी दोन कोटी ७३ लाख रुपये मंजूर झाले. सदर पुलाचे भूमिपूजनही झाले. मोठमोठे बॅनर लावण्यात आले. साहेबांचे आभारही मानले. परंतु दोन वर्षांनंतरही पुलाचे काम झालेच नाही. सदर परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. सदर ठिकाणी शेतकऱ्यांनी मिळून तात्पुरत्या स्वरूपाचा मातीचा पूल उभारला आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी व पुढाऱ्यांनी सदर पूल बांधून द्यावा अशी मागणी नागरिक करत आहेत.

सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या मतदारसंघातील अनेक रस्त्यांना क्रमांकचे नसल्याने हे भाग विकासापासून दूरच आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सदर रस्त्यास क्रमांक देणे व सदर भागाचा विकास करणे हे कोणाचे काम असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. काही स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या भागातील पांदन रस्त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरण केले. परंतु सामान्य शेतकऱ्यांच्या पांदन रस्त्याचे काय ? अंतर्गत पांदन रस्त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरण, रस्त्याला नंबर देणे याकडे प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याने सदर भाग विकासापासून वंचित आहे. दळणवळणास अडचण आहे, नागरिकांना पावसाळ्यात ये-जा करणे कमालीचे अवघड जात आहे. शेतकऱ्यांना पावसाळ्यात तेवढ्यात चिखलातून पायपीट करावी लागते. नाहक त्रास सहन करावा लागतो.

कामठा-नांदेड रस्ता मागील तीन वर्षापूर्वी झाला. परंतु एक ते दीड वर्षात रस्ता खराब झाल्याने ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात येथून ये-जा करणे जीवघेणे ठरत आहेत. सदर रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. सदर रस्त्यावरून शालेय विद्यार्थी, प्रवासी, शेतकरी, व्यवसायिक नांदेड शहरात ये-जा करतात.

- सुरेश कोंडापुरे, कामठा, ग्रामस्थ

मालेगावातील अनेक पांदण रस्त्यांना क्रमांक नसल्याने दळणवळणाचा प्रश्न गंभीर आहे. पांदण रस्त्यासाठी ग्रामपंचायत व स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन पांदण रस्त्याला क्रमांक मिळवून देणे गरजेचे आहे. रस्त्यास क्रमांक नसल्याने गुत्तेदार काम करू शकत नाही.

- भगवान इंगोले, पुरस्कार प्राप्त शेतकरी

गावातील अनेक पांदण रस्त्यांना क्रमांकच नाहीत. त्यामुळे सदर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण झालेले नाही. आम्ही पांदण रस्त्यांना क्रमांक देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. मालेगाव येथील गिरजानदी जवळील स्मशानभूमी ते कॅनलरोड असा दोन किमीच्या अंतर्गत रस्त्याला क्रमांक देण्यासाठीचा ठराव वरिष्ठांकडे पाठवला आहे. क्रमांक मिळाल्यानंतर सदर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणार आहोत. एमआरजीएस अंतर्गत मालेगावला ८० लाख रुपये मंजूर झाले. परंतु कमी कालावधी काम करणे गरजेचे आहे.

- अनिल इंगोले, सरपंच, मालेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.