नांदेड : सर्वच रस्त्यांची अवस्था दैनी...

अधिकारी, ठेकेदार मालामाल; ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ ची चर्चा
Nanded Kandhar highways and internal roads bad construction
Nanded Kandhar highways and internal roads bad constructionsakal
Updated on

फुलवळ : कंधार तालुक्यातील राष्ट्रीय, राज्य महामार्गाबरोबरच अंतर्गत रस्ते व तांडावस्तीच्या रस्त्यांची बकाल अवस्था झाली आहे. सरकारी तिजोरीतून नवीन रस्ते बनवणे, दुरुस्ती करणे यासाठी कोटीने पैसा येतो परंतु स्थानिक लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे व वरिष्ठांच्या डोळेझाकपणामुळे नाकर्तेपणाचा कळस गाठला आहे. टक्केवारीचे धनी ठरलेले असून संबंधित ठेकेदार व अधिकारी मात्र मनमानी कारभार करत असल्यामुळे या भागातील रस्त्यांची अवस्था बकाल झाली असून अधिकारी, ठेकेदार मात्र मालामाल झाले, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

नांदेड ते उदगीर राष्ट्रीय महामार्गाबरोबरच फुलवळ ते मुंडेवाडी, जंगमवाडी, सोमासवाडी, महादेव मंदिर ते कंधारेवाडी - पानशेवडी, बिजेवाडी ते शेकापूर राज्य महामार्ग, पट्टाचा तांडा ते पोखर्णी, पानशेवडी ते नेहरूनगर, आंबुलगा ते वाखरड, सोमठाणा ते कुरुळा आदींसह परिसरातील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. येणाऱ्या पावसाळ्यात याचे गंभीर परिणाम जनमाणसाला भोगावे लागतील तेंव्हा वेळीच प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देऊन सदर प्रश्न सोडवावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नांदेड ते उस्माननगर, फुलवळ मार्गे उदगीर जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० चे काम गेली दोन ते अडीच वर्षांपूर्वी चालू झाले. परंतु अद्यापही त्याचा शेवट झाला नाही. मानसपुरी येथील महादेव मंदिरापासून अर्धवट राहिलेला राष्ट्रीय माहामार्ग खडतर जीवघेणा बनला आहे तर बहाद्दरपुरा येथील नेहरू उद्यान शांतिघाट येथील मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून खड्डेमय रस्त्यातून मार्ग काढणे कठीण झाले आहे. मन्याड नदीवर असलेल्या पुलावरील रस्त्याची सुद्धा अशीच चाळणी झाली असून पुलाच्या बाजूने असलेले संरक्षण पाईप गायब झाले आहेत तर पथदिवे कित्येक दिवसांपासून बंद पडले असल्याने रात्रीचा प्रवास धोकादायक बनला आहे. राष्ट्रीय महामार्ग चा मन्याड नदीवर मंजूर नवीन पुलाच्या कामाला अद्याप सुरुवात झाली नसल्याने हा प्रश्न प्रलंबितच आहे.

फुलवळ येथेही राष्ट्रीय महामार्गाचे काम अर्धवट सोडून संबंधित ठेकेदार गायब झाला आहे. फुलवळ ते मुंडेवाडी-वाखरड जाणाऱ्या प्रमुख रस्त्याला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. मुंडेवाडीकडून अर्धवट रस्त्याचे काम प्रलंबित आहे. महादेव तांडा येथे उन्हाळ्यात धड पायी चालण्यायोग्य रस्ता नसून पावसाळ्यात एखादा रुग्ण असो का प्रसुतीची महिला त्यांना बाजेवर टाकून दवाखान्यात पोहचावे लागते.

अधिकारी टक्केवारीचे तर कंत्राटदार नफ्याचे बघतो म्हणून दरवर्षी तेच रस्ते पुन्हा पुन्हा करूनही त्याची दरवस्था आहे तशीच आहे. असाच प्रकार राष्ट्रीय महामार्गाचा झाला असून अनेकवेळा लेखी निवेदने देऊनही काम प्रलंबित पडले आहे. मोठ्या रस्त्यांच्या कामांना क्वालिटी कंट्रोलकडून कालमर्यादा ठरवून दिलेल्या असतात तसेच आता ग्रामीण व ग्रामपंचायत स्तरावरही बंधनकारक केले तर नक्कीच गैरव्यवहार थांबेल आणि कामेही चांगल्या दर्जाची होतील.

- आनंदा पवार, सामाजिक कार्यकर्ते, फुलवळ.

आमच्या मतदारसंघाला कोणी वालीच नसल्याची परिस्थिती निर्माण झाली असून भ्रष्टाचाराने धुमाकूळ घातला आहे. कित्येक महिन्यांपासून राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू आहे. तसेच पांगरा ते कंधार - माळाकोळीचा रस्ता, पाताळगंगा ते उमरज-दगडसांगवी, पानशेवडी ते नेहरूनगर असे अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. कार्यतत्पर लोकप्रतिनिधी आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत मतदारसंघातील जनतेला विकास दिसणार नाही.

- भगवान राठोड, तालुकाध्यक्ष, भाजप, कंधार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()