नांदेड : शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीपूर्वी बियाण्याची उगवणक्षमता तपासून घ्यावी. तसेच पेरणीसाठी घाई न करता सलग तीन दिवस १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच जमिनीत पुरेसा ओलावा पाहून पेरणी करावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.
जिल्ह्यात सध्या खरीप हंगाम पेरणीची कामे सुरु झाले आहेत. पाऊस झालेल्या भागात शेतकरी सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद, ज्वारी आदी पिकांची पेरणी करीत आहेत, परंतु पाऊस भागात काही पाऊस झाला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी सतत तीन दिवस १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे. घरचे अथवा बाजारातून आणलेले सोयाबीन पेरणीपूर्वी उगवण क्षमता तपासावी. पेरणी करता एकाच कंपनीच्या डीएपीची मागणी करु नये.
बाजारात उपलब्ध होणार्या सर्व डीएपी खतामध्ये नत्र व स्फुरद चे प्रमाण सारख्या प्रमाणात असल्यामुळे शेतकर्यांनी उपलब्ध असलेल्या डीएपीचा वापर करावा. सोयाबीन पिकाची पेरणी करताना युरीया व सिंगल सुपर फॉस्फेट किंवा एनपीके मध्ये २०:२०:०:१३ या खताचा वापर करावा. गंधकयुक्त खते पिकांना द्यावी. अनुदानित रासायनिक खतांची खरेदी करताना विक्रेत्याकडून ई-पाश मशीन वरील खत खरेदी केल्यानंतर बॅग वर नमूद असलेली किंमत व विक्री त्यांनी दिलेले बिल तपासून घ्यावे. बियाणे खरेदी केल्यानंतर त्याची पिशवी व त्यातील थोडे बियाणे हंगाम संपेपर्यंत जतन करून ठेवावे. बॅगवर नमूद केलेल्या एमआरपी पेक्षा जादा दराने विक्री होत असल्यास शेतकर्यांनी तत्काळ संबंधित तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी किंवा जिल्हा तक्रार निवारण कक्षाच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा, (०२४६२-२८४२५२) असे आवाहनही रविशंकर चलवदे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.