नांदेड : जोडणी न देताच कृषीपंपाची लाखोंची वीजबिले, शेतकऱ्यांचे उपोषण सुरु ; उर्जामंत्र्यांनाही दिले निवेदन

file photo
file photo
Updated on

कुंडलनाडी (जिल्हा नांदेड) : कुंडलवाडी (ता. बिलोली) येथील पाच शेतकऱ्यांच्या शेतात शेतीपंप विज जोडणी न करताच गेल्या सहा वर्षापासूनचे लाखों रुपयांची बिले यांच्या माथी लावण्याचे काम विद्युत महावितरण कंपनीने केले आहे.


याबाबत तक्रार करुनही उपयोग झाला नसल्याने शेतकऱ्यांनी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयापुढे सोमवारपासून (ता. २३) उपोषण सुरु केले आहे. कुंडलवाडी येथील शेतकरी अशोक रामजी गायकवाड, भूमाबाइ सायलू करेवाड, राजन्ना राजन्ना नागूलवाड, रामलू हूसेना कोटलावार व धनराज हनमंत रत्नागीरे या शेतकऱ्यांनी कृषी पंपासाठी विज मिळावी, यासाठी २०१४ मध्ये महावितरण कंपनीला अर्ज केले होते.

यानंतर विद्युत जोडणी झाली नाही. परंतु विजबिल मात्र लाखोंची आली आहेत. याबाबत महावितरणशी संपर्क केला असता, त्यांनी कनेक्शनचे सर्वे चालू आहे, सर्वे पूर्ण झाले, पुढच्या वर्षी पोल येणार आहेत, सरकार बदलले, ठेकेदार काम करीत नाहीत, असे उत्तरे देण्यात आली आहेत, उत्तर मिळत असल्याने चौकशी करुन संबंधित अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली. परंतु काही उपयोग झाला नसल्याने येथील शेतकऱ्यांनी सोमवारपासून महावितरण कंपनीच्या
कुंडलवाडी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()