नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या उलट तपासणीत साडेआठ लाखाच्या बॅग लिफ्टींगचा बनाव उघड

शुक्रवारी (ता. २८) सकाळी दहाच्या सुमारास साडेआठ लाख रुपयांची बॅग दोन चोरट्यांनी चाकुचा धाक दाखवून जबरीने चोरली म्हणून पोलिस ठाण्यात आलेल्या व्यक्तीची सत्यता पडताळणी केली असता कांही मिनिटातच हा प्रकार उघड झाला.
क्राईम न्यूज नांदेड
क्राईम न्यूज नांदेड
Updated on

नांदेड : शहरात मागील काही दिवसामध्ये ब्रग लिफ्टींगचे प्रकार घडले. मातर् पोलिसांनी शास्त्रशुद्ध पधदातीने या प्रकरणाचा उलगडा केला. यातील गुन्हेगार पोलिस कोठडीत असतानाच पुन्हा एकाने शुक्रवारी (ता. २८) सकाळी दहा वाजता शिवाजीनगर पोलिस ठाण्यात साडेआठ लाखाची बॅग लंपास दोन अनोळखीने चाकुचा धाक दाखवून पळविल्याची तक्रार घेऊन एकजण आला. मात्र त्याची उलट तपासणी पोलिसांनी घेतली असता त्याने पोलिसांना मामा बनविण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. प्रकरणाची सत्यता स्थानिक गुन्हे शाखेने तपासल्यानंतर गणेश पतंगेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

शुक्रवारी (ता. २८) सकाळी दहाच्या सुमारास साडेआठ लाख रुपयांची बॅग दोन चोरट्यांनी चाकुचा धाक दाखवून जबरीने चोरली म्हणून पोलिस ठाण्यात आलेल्या व्यक्तीची सत्यता पडताळणी केली असता कांही मिनिटातच हा प्रकार उघड झाला. त्यामुळे बॅग चोरीला गेलीच नाही हे स्पष्ट झाले. पण बॅग चोरीला गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांची मात्र चांगलीच धांदल उडाली.

हेही वाचा - देवस्थानालाही न सोडणारा लाचखोर तलाठी विजयकुमार कुलकर्णी चार हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात.

शहराच्या सोमेश काॅलनीत राहणारा गणेश उत्तम पतंगे याच्या सांगण्यावरुन पोलिसांनी शहरात तात्काळ नाकाबंदी लावली.पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांच्या आदेशावरुन शिवाजीनगरचे पोलिस निरिक्षक अनंत नरुटे, वजिराबादचे जगदीश भंडरवार, ईतवाराचे साहेबराव नरवाडे, भाग्यनगरचे अभिमन्यु साळुंके, विमानतळचे संजय ननवरे आणि त्यांचे सहकारी पोलिस अंमलदार रस्त्यावर आले. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर आपल्या सहकारी पोलिस अधिकारी आणि अंमलदारांसह शिवाजीनगरला हजर झाले. गणेश उत्तम पतंगेकडून माहिती घेतली असता त्यांनी तीन लाख 20 हजार रुपये बॅंकेत भरले होते. 50 हजार रुपये नारळपाणी विकणाऱ्याला दिले होते आणि दोन लाख 50 हजार रुपये त्यांच्या घरात असल्याचे पोलिसांना सांगितले.

पोलिसांची तारांबळ उडवून खोटी तक्रार करण्याचा प्रयत्न का केला या बद्दल माहिती घेतली असता गणेश पतंगेने सांगितले की, अनेक लोकांचे पैसे देणे बाकी आहे. त्यांनी आपल्याला पैसे मागू नयेत म्हणून हा सर्व प्रकार केला. पोलिसांना मामा बनविण्याचा केलेला प्रयत्न गणेश पतंगेच्याच अंगलच आला. त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()