नांदेड - घरांची मागणी वाढण्याला लॉकडाउन कारणीभूत, कसे ते वाचा...

File Photo
File Photo
Updated on

नांदेड -  कोरोनाचा प्रादूर्भावामुळे लॉकडाउन दरम्यान पुणे, मुंबई, नासिक व औरंगाबाद सारख्या शहरातील कामगार गावाकडे परतलेल्या कंपनीचे मोठे नुकसान सुरु झाले. हे नुकसान टाळण्यासाठी मालकाने  वर्कफ्रॉम हम काम दिले. यामुळे कर्मचाऱ्यांना घरबसल्या काम करणे सहज शक्य झाले आहे. पुणे, मुंबई, नाशिक आणि औरंगाबादेत न जाताच औद्योगिक वसाहतीतील कामगारांना घरतातुन काम करणे शक्य झाले. दुसरीकडे शहरातील कामगार त्या-त्या जिल्ह्यात परतल्याने गावाकडचे पूर्वीचे घरदार आता कमी पडुलागले आहे. नेमक्या याच कारणामुळे नवीन घर खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

मराठवाड्यातील नांदेडसह परभणी, हिंगोली या जिल्ह्यात लाखो विद्यार्थ्यांचा व कामगारांचा देखील यात समावेश आहे. त्यामुळे घरातील सदस्य वाढल्याने पूर्वीचे घर अपुरे पडत असल्याने शहरातील बांधलेले घर खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. पूर्वी ग्राहकांना दहा लाखाचे घर खरेदी केल्यास स्टॅम्पड्युटीसाठी ६० ते ७० हजार रुपये मोजावे लागत असत. मात्र, स्टॅम्प ड्युटी सहा ते सात टक्यावरुन थेट तीन टक्यावर आल्याने आता ३० हजार रुपये इतका खर्च कमी झाला आहे. 

या कारणामुळे घर खरेदीला प्रतिसाद

शिवाय बँकेकडून गृहकर्ज पूर्वी साडेआठ टक्के व्याज आकारले जात असे ते सहा टक्यावर येऊन ठेपले आहे. यामुळे बांधकाम व्यवसायिकांना अच्छे दिन नसले तरी, नवीन घर खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या ग्राहकांना मात्र अच्छे दिन आले आहेत हे नक्की. 
नोटबंदी नतर नांदेड शहरात हजारो घरे बांधुन तयार होती. परंतू, त्या घरांना फारशी मागणी होत नव्हती. ज्यांचे पक्के घर नाही अशा नागरिकंना शासनाकडून घरकुलासाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत दोन लाख ६७ हजार रुपयापर्यंतचा लाभ दिला जात होता. परंतू, सिमेंट, गजाळी, रेतीचे भाव गगनाला भिडल्याने दोन लाखात घर होणे शक्य नसल्याने घरकुल लाभार्थ्यांना दोन लाख ६७ व्यतिरिक्त पाच लाख रुपयापर्यंतचे हगृहकर्ज दिले जाते.

घर सामान्यांच्या अवाक्यात

त्यासाठी स्वतःची जागा हवी असते. बांधकाम व्यवसायिकांनी बांधलेली घरे विकत नसल्याने त्यांनी देखील पंतप्रधान आवास योजनेच्या अटी व शर्थीच्या अधिन राहुन घरकुल पद्धतीच्या नवीन घरांची रचना केली आहे. ही घरे सर्वसामान्यांना परवडतील अशा किमतीमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे शिवाय बँकेच्या मुळ कर्जावर लाभार्थ्यांना दोन लाख ६७ हजार रुपयापर्यंचा लाभ मिळत असल्याने काही प्रमाणात घर खरेदी करण्यासाठी ग्राहक तयार होत आहेत. 

तयार घरांना जास्त मागणी 
सिमेंट, रेतीचे दर वाढल्याने प्लॉट खरेदी करुन घर बांधणे सोपे राहिले नाही. वर्क फ्रॉम होमची संकल्पना प्रत्यक्षात आल्यापासून घरातील सदस्य वाढले त्यामुळे पूर्वीचे घर लहान पडत असल्याने तयार घरांना जास्त मागणी होत आहे. 
-अभिजित रेणापूरकर (बांधकाम व्यवसायिक)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()