Nanded : स्वातंत्र्याएवढाच मराठवाडामुक्तीचा लढाही तोलामोलाचा...; मंत्री. मुनगंटीवार

बंदाघाट येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवी कार्यक्रमाचा शुभारंभ
 मुनगंटीवार
मुनगंटीवारsakal
Updated on

नांदेड : मराठवाड्यातील जनतेला स्वातंत्र्यासाठी दोनवेळेस लढा द्यावा लागला. पहिला लढा हा ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त होण्याचा होता. दुसरा लढा हा भारतात जी काही संस्थाने शिल्लक होती, त्यापैकी आपल्या संस्थानाला स्वतंत्र देशात निर्माण करू पाहणाऱ्या निजामाशी लढा द्यावा लागला. निजामाची प्रवृत्ती ही भारताच्या अखंडतेला आव्हान देणारी असल्यामुळे मराठवाडा मुक्तीच्या लढ्याचे मोल हे स्वातंत्र्य लढ्याइतकेच महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य, वने, मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बंदाघाट येथे आयोजित उद्‍घाटन समारंभात ते शनिवारी (ता.एक) बोलत होते. यावेळी खासदार तथा समिती अध्यक्ष प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राजेश पवार, ज्येष्ठ साहित्यीक लक्ष्मीकांत तांबोळी, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी

अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, प्रवीण साले, दिलीप कंदकुर्ते, चैतन्यबापू देशमुख, समिती सदस्य प्रा. सुनील नेरलकर, शंतनू डोईफोडे, आनंदी विकास, लक्ष्मण संगेवार, बालाजी बच्चेवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 मुनगंटीवार
Sambhaji nagar : राजकारणाचा केंद्रबिंदू ठरतंय छत्रपती संभाजीनगर

मराठवाडा मुक्तीचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोचवणार

पायाभूत सुविधा विकासाएवढेच आपले सांस्कृतिक वैभव व इतिहासाच्या पानात दडलेले वैभव जतन करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. मराठवाडा मुक्तीचा हा लढा नव्या पिढी पर्यंत पोहचविण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही मंत्री मुनगंटीवार यांनी दिली.

 मुनगंटीवार
Nanded : जिल्हा परिषदेचे विद्यार्थी करणार ‘इस्रो’ची वारी !

१६ स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान

मराठवाडा मुक्ती संग्रामाचे मोल नव्यापिढी पर्यंत पोहचविण्यासाठी समिती वेगवेगळे उपक्रम आखत आहे. अर्जापूर येथे हुतात्मा गोविंद पानसरे यांच्या स्मारकाला अभिवादन करून शासनातर्फे प्रातिनिधिक स्वरुपात जिल्ह्यातील १६ स्वातंत्र सैनिकांचा सन्मान करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

(ता.एक) मे रोजी जिल्ह्यातील सहा लाख विद्यार्थी मराठवाडा मुक्तीची ही गाथा वृद्धींगत करण्यासाठी एकाचवेळी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष तथा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.