अर्धापूर : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने भाकरी फिरविली असून तेरापैकी तब्बल आठ नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. तसेच चार ते पाच आयाराम-गयारामांना संधी दिली तर चार विद्यमान संचालकांना डिच्यू दिला आहे. हे करित असताना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे गणित डोळ्यासमोर ठेवून उमेदवारी देण्यात आली आहे.
विद्यमान संचालक माजी सभापती बी.आर. कदम, पप्पु पाटील कोंढेकर, आनंदराव कपाटे, अनिता क्षिरसागर यांना उमेदवारी नाकारली असून जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, निळकंठ मदने, ज्ञानेश्वर राजेगोरे, गायत्री गजानन कदम, यांना प्रथमच संधी देण्यात आली आहे. तर माजी सभापती श्यामराव पाटील टेकाळे यांना एका निवडणुकीच्या ब्रेकनंतर उमेदवारी दिली आहे तर भाजप मधुन स्वगृही आलेले माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा,
सदाशिवराव देशमुख, निलेश देशमुख, गांधी पवार यांना उमेदवारी दिली आहे. या नव्या-जुन्याच्या प्रयोगात उत्सुक उमेदवारांत खूप मोठी नारजी असून उघडपणे स्थानिक पातळीवरील नेत्यांना खडे बोल सुनावले जात आहेत. याचा फटका महाविकास आघाडीच्या पॅनेलला बसण्याची शक्यता आहे.
नांदेड जिल्ह्यातील पाच कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू असली तरी सर्वांच्या नजरा नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे लागल्या आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व खासदार प्रताप पाटील चिखलीकर पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. या बाजार समितीवर गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसची सत्ता राहिली आहे. यंदाच्या निवडणुकीत चमत्कार करण्याच्या तयारीत युतीचे नेते असले तरी खूप मोठी महेनत करावी लागणार आहे.
तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी सभापती श्यामराव पाटील टेकाळे यांना एका निवडणुकीच्या ब्रेकनंतर उमेदवारी दिली आहे. तर जिल्हाध्यक्षांच्या स्पर्धेत असलेले काँग्रेस जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर यांना बाजार समितीच्या निवडणुकीत प्रथमच संधी दिली आहे. तसेच पार्डीचे माजी सरपंच निळकंठ मदने, ज्ञानेश्वर राजेगोरे, गायत्री गजानन कदम यांना प्रथमच संधी दिली आहे. नांदेड तालुक्यातील दोन ते तीन उमेदवार प्रथमच निवडणूक लढवित आहेत.
दगाफटका होणार नाही याची काळजी
अर्धापूर तालुक्यातील बहुतांश सेवा सहकारी सोसायटी व ग्रामपंचायतवर काँग्रेसी सत्ता असली तरी बाजार समितीचे मतदार हे भारी असतात. कोणाला मार्केट यार्डमध्ये आणायचे व कोणाला बाहेर काढायचे हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. काँग्रेस वरकरणी पाहता एकसंघ दिसत असली तरी गटातटांना एकत्र करून निवडणूक प्रचार केला तर दगाफटका होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल अशी चर्चा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.