नांदेड : बाजारात 'लग्नसोहळ्याच्या' खरेदीची धूम

दोन वर्षांनंतर व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य परतले
Nanded market wedding season shopping crowd
Nanded market wedding season shopping crowdsakal
Updated on

नांदेड : कोरोनाचे निर्बंध काढल्यानंतर दोन वर्षापासून लग्नसराईनिमित्त बाजारपेठेत खरेदीची धूम पाहायला मिळत आहे. कपडे, दागिने, संसारपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स साहित्यासह इतरही वस्तूंच्या खरेदीला वेग आलेला आहे. यामुळे व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य परतले आहे. जून महिन्यात पुन्हा कोरोनाचे संकट ओढवण्याची भीती वाटप असल्याने सर्वांनीच मे महिन्यापर्यंतचे मुहूर्त नक्की केलेले आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणू संसर्गामुळे बाजारपेठांमध्ये सन्नाटा होता. आता परिस्थिती पूर्वपदावर आली असून कोरोना रुग्णांची संख्याही एक आकडी आलेली आहे. त्यामुळे धुमधडाक्यात लग्नाचा बार उडविण्यासाठी अनेकांनी जोमाने तयारी सुरु केलेली आहे. भव्य दिव्य सोहळा साजरा करण्यासाठी नियोजनही केले जात आहे. जुलै महिन्यापर्यंत चालणाऱ्या सोहळ्यासाठी लगबग सुरु झालेली आहे. यात प्रामुख्याने लग्नाचा बस्ता, दागिने, साड्या, रेडिमेड कपडे, फूटवेअर, लग्नपत्रिका, ड्रायफ्र्ुस मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहे.

यावर्षी विक्रमी विवाह सोहळे होण्याची शक्यता आहे. परिणामी चांगला व्यवसाय अपेक्षित आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या आकर्षक योजनाही राबविण्यात येत आहे. शहर आणि आजूबाजूच्या बॅंक्वेट हॉल्स, हॉटेल्स, खुली लॉन्स, फार्म हाऊसेस विवाहसोहळ्यांसाठी सज्ज आहेत. उन वाढले असल्यामुळे ग्राहकांची सायंकाळी पाचनंतर बाजारामध्ये खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. त्यामुळे उशिरापर्यंत बाजारात चैतन्य दिसू लागले आहे. दोन वर्षानंतर ग्राहक विविध वस्तू खरेदी करत असल्याने त्यांच्या पद्धतीतही बदल झालेला आहे. पूर्वी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात होती. त्यात आता शॉर्टकट मारला जात आहे. मात्र, अनेक दिवसानंतर चांगले दिवस आलेले आहेत, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून लग्नसराई आणि उत्सवांवर विरजण पडले होते. आता कोरोनाचे सावट पूर्णपणे हटलेले आहे. त्यामुळे बाजारात ग्राहकांची गर्दी वाढलेली आहे. लग्नसराईची खरेदी जोमाने केली जात आहे. यंदा लग्नसोहळ्यासाठी पारंपारिक साड्यांना अधिक पसंती आहे. त्यात सिल्क, डिझायनर आणि कांजीवरम साड्यांचा समावेश आहे. संगीत आणि स्वागत सोहळ्यासाठी डिझायनर गाऊन्सला पसंती दिली जात आहे.

- हनुमान मनियार (व्यापारी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()