नांदेड : विकेंड लॉकडाउनमध्ये निवघ्यात रस्त्यावर मास विक्री जोरात, सामाजीक अंतराचा फज्जा

file photo
file photo
Updated on

निवघाबाजार ( जिल्हा नांदेड ) : सध्या महाराष्ट्रासह इतर राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरु असल्याने मृत्युचे प्रमाण वाढले आहे. यातच राज्य सरकारने विकेंड लॉकडाऊनमध्ये कडक निर्बंध लावले आहेत. परंतू निवघा ( बा.) येथे रस्त्याच्या मधोमध मास विक्री खुलेआम चालू असून सोशल डिस्टसिंगचा पुरता फज्जा उडाला आहे. याबाबत येथील ग्रामपंचायतला रस्त्यावर होत असलेल्या मास विक्रीबाबत तिन वेळा निवेदन दिले असून कोणतीही कार्यवाही केली नसल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करित आहेत.

हदगांव तालुक्यातील सर्वात मोठे असलेले निवघा हे गांव येथील लोकसंख्या पंधरा ते विस हजारांच्या आसपास आहे. येथील ग्रामपंचायत कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असते. येथील बसस्थानक परिसरात अनेक उचभ्रू लोकांची वस्ती आहे. या वस्तीमध्ये अनेक मोठ्या व्यापाऱ्यांची घरे आहेत. याच वस्तीजवळ हनुमान मंदिर आहे. तर वैदू समाजाचे मंदिर आहे. याच मंदिराला लागून व हदगांव, बाळापूर रस्त्यालगत मास विक्रिचे दुकाण थाटले आहेत, तर एकाने पोल्ट्री फार्म सुरु केल्याने, येथील नागरीकाना याचा मोठा त्रास होत आहे. सध्या राज्य सरकारने लॉकडाऊन संदर्भात मोठे निर्बंध घातले आहेत. कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत असून मृत्युच्या प्रमाणात मोठी वाढ होत असल्याने  केवळ जिवनावश्यक वस्तूचे दुकाने सुरु करण्याची मुभा दिली आहे. परंतू येथील मास विक्रीचे दुकाने खुलीआम चालू असून ग्राहक मोठ्या प्रमाणात येथे गर्दी करित आहेत. तर या मास विक्रीमुळे रस्त्यावर मोकाट कुत्र्याचा वावर असतो. यामुळे छोटे मोठे अपघात नेहमीच होत असतात. 

या गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असून, यावर निर्बंध घालण्यासाठी येथील ग्रामपंचायत अपयशी ठरली आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी ग्रामपंचायतने कोणतेही पाऊल उचलले नसल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करित आहेत. तर येथील रस्त्यालगत असलेले मास विक्रीचे दुकान हटविण्यासाठी तिन वेळा निवेदन दिले असून ग्रामपंचायतने कोणतीही कार्यवाही केली नसल्याची खंत विनायकराव कदम यानी बोलून दाखविली आहे. निवेदनावर विनायकराव कदम, भगवानराव शिंदे, सुभाष कदम सह शेकडो ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

या संदर्भात आम्ही एक बैठक घेतली असून यामध्ये आम्हा मास विक्री करण्यासाठी ग्रामपंचायतने जागा नेमून देण्यात येईल असे सांगीतले होते. परंतू आणखी आम्हाला जागा उपलब्ध करुन दिली नसल्याने पर्यायाने येथेच मास विक्री करावी लागत आहेत.
- शेख ईस्माइल ( मांस विक्रेता तथा ग्रामपंचायत सदस्य )

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.