मुक्रमाबाद (जिल्हा नांदेड) : समाजातील खोट्या प्रतिष्ठेसाठी आपला वाढदिवस हा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यासाठी पार्ट्या करणे, आतिषबाजी आपल्या श्रीमंतीचे हिडीस दर्शन घडवून मीच मोठा या अविर्भावात वाढदिवसावर अनाठायी लाखो रुपयांची उधळपट्टी करतात. पण या अनाठायी खर्चाला फाटा देत मुखेड तालुका तलाठी संघटनेचे कार्यध्यक्ष सतिष देशमुख यांनी मुक्रमाबाद येथील नागरी दवाखान्याला औषधी साठा घेऊन देत माणूसकी जपली आहे.
दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रार्भाव आणि त्यात लॉकडाऊनमुळे गरीबाची होत असलेली होरपळ ही, मनाला चटका लाऊन जाणारी आहे. या अशा परिस्थितीत मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील नागरी दवाखान्यात औषधीचा साठा हा अल्प असल्यामुळे शहरातील व परिसरातील असंख्य नागरिकांची औषधा अभावी होरपळ सुरु असल्यामुळे या कोरोनाच्या काळात सामान्य नागरिकांना औषधी साठा उपलब्ध व्हावा यासाठी मुखेड तालुक्याचे तलाठी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रातोळीकर यांनी समाजभान ठेवून सतिष देशमुख यांच्या वाढदिवसावर होत असलेला अनाठायी खर्च टाळून येथील नागरी दवाखान्याला औषधी साठा घेऊन देऊन वाढदिवस अगदी साध्या पध्दतीने केल्यामुळे त्यांचे सर्वच स्तरांतून मोठे कौतुक होत आहे.
हेही वाचा - मुलगी बोहल्यावर चढण्याआधी वडिलांचा मृत्यू; माहूर तालुक्यातील हरडफ येथील हृदय हेलावणारी घटना
यावेळी भाजपाचे ग्रामीण जिल्हाअध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदिश गायकवाड रावीकर, तलाठी संघटनेचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर रातोळीकर, उदयकुमार मिसाळे, सुभाषाअप्पा बोधने, उपसरपंच सदाशिव बोयवार, रवी पंदिलवार, यशवंत कुलकर्णी, डी. जी. कल्याणकर, शिवाजी तोतरे, मारोती श्रीरामे यांच्या उपस्थिती होती.
संपादन- प्रल्हाद कांबळे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.