नांदेड - कोरोना संसर्गामुळे दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी मंगळवारी (ता. सहा) विष्णुपुरीतील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येथे जाऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत ऑक्सिजन, रेमडीसिव्हिर व बेड रुग्णांना तत्काळ उपलब्ध करून देण्याबाबत सूचना त्यांनी सूचना केल्या.
या बैठकीला अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंद पाटील बोंढारकर यांच्यासह डॉ. विवेक सहस्त्रबुद्धे, डॉ. हेमंत गोडबोले, वैद्यकीय उपाधीक्षक डॉ. प्रदीप बोडके, डॉ. गणेश मनुरकर, डॉ. व्यंकटेश खडके, औषध भांडार प्रमुख डॉ. एन. के. नंदनवनकर, नियोजन अधिकारी बालाजी डोळे, पार्वती भोकरे आदी उपस्थित होते. सर्व डॉक्टर, नर्सिंग स्टाफ व कर्मचारी हे या महामारीत ही आपली जीवाची पर्वा न करता अहोरात्र चांगल्या पद्धतीने काम करत असल्याचे सांगून त्यांचे कौतुक केले. सर्वांनी रुग्णांना चांगली सेवा द्यावी यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक असलेली सर्व मदत करण्याचे आश्वासन आमदार कल्याणकर यांनी दिले.
उपलब्ध सुविधांची दिली माहिती
सध्या शहरात कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे सर्व नागरिक भयभीत झाले आहेत.याचे परिणाम ग्रामीण भागात देखील दिसत आहेत. रुग्णांना वेळेतच रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. त्याबरोबरच ऑक्सिजन, रेमडीसीवीर यासारखी महत्वाची इंजेक्शने देखील उपलब्ध होत नाहीत. शासकीय यंत्रणेकडे देखील बेड नसल्याचे समोर येत आहे. अशा अनेक तक्रारी आमदार कल्याणकर यांच्याकडे आल्या. त्यांनी याची शहानिशा करण्यासाठी वैद्यकीय विभागाची बैठक बोलावली होती. यावेळी रुग्णालयात ऑक्सिजनचे तीनशे बेड, शंभर व्हेंटीलेटर, पुढील दोन दिवस पुरेल एवढा ऑक्सिजनचा साठा, दहा हजार किलो ऑक्सिजनची क्षमता असणारे दोन टॅंक उपलब्ध आहेत. त्याबरोबरच रेमडेसिव्हिरचा पुरेसा साठा आहे. तसेच पुढील दहा दिवसात आणखी शंभर बेड उपलब्ध करत असल्याची माहिती वैद्यकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्याबरोबर तीस व्हेंटिलेटरची मागणी देखील वैद्यकीय विभागाने केली असल्याचे सांगितले.
अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सौजन्याने वागावे
रुग्णांच्या सुविधेसाठी लाऊडस्पीकर व वॉकीटॉकीची व्यवस्था तसेच ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर व बेडची कमतरता भासणार नाही, याची आत्ताच वैद्यकीय विभागाने खबरदारी घ्यावी, अशा सूचना श्री. कल्याणकर यांनी केल्या. त्याबरोबरच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांबरोबर येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सौजन्याने वागून मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता शहरात नवीन जेम्बो कोविड सेंटर उभारणे गरजेचे आहे. मात्र, वैद्यकीय विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे वैद्यकीय विभागाने आमदार बालाजी कल्याणकर यांना सांगितले. याबाबत नवीन स्टाफ उपलब्ध करून देण्याची मागणी वैद्यकीय मंत्र्यांकडे करणार असल्याचे श्री. कल्याणकर यांनी सांगितले आहे.
हेही वाचलेच पाहिजे - नांदेड महापालिकेच्या सभेत अर्थसंकल्प सादर; महापौरांना सर्वाधिकार
नवीन जम्बो कोविड सेंटर उभारणे गरजेचे
आमदार कल्याणकर यांनी वैद्यकीय विभागाला बेड वाढविण्याबाबत सूचना केल्या. येथील रुग्णालयात वैद्यकीय विभागाकडून स्वच्छतेबाबत अधिकची काळजी घेतली जात आहे. रुग्णालय व परिसरात स्वच्छता दिसून आली त्याबद्दल त्यांनी वैद्यकीय विभागाचे यावेळी आभार मानले.
वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता शहरात नवीन जम्बो कोविड सेंटर उभारणे गरजेचे आहे. मात्र, वैद्यकीय विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे वैद्यकीय विभागाने आमदार कल्याणकर यांना सांगितले. याबाबत नवीन स्टाफ उपलब्ध करून देण्याची मागणी वैद्यकीय मंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.