पाऊस सरीन रूक्ष मातीचं सौभाग्य ऊजाळलं!

बळिराजाची लक्ष्मी बळकट झाली ; बिजांकुराना संजीवनी मिळाली
Nanded monsoon rain weather update farmer cotton kharif sowing
Nanded monsoon rain weather update farmer cotton kharif sowingsakal
Updated on

भोकर : वैशाख वणव्यात तावून सुलाखून निघालेल मन पावसाच्या थेंबासाठी आसुसलेल असताना नभागंणी ढगांची शाळा भरली आणि पाऊससरी फेरधरू लागल्या.. मृदगंध निर्माता पाऊस टपोऱ्या थेंबाची पालखी घेऊन ऊन्मेशाचा आणि चैतन्याचा अनोखा सोहळा साजरा करतो आहे...आकाशाकडे टक लावून बसलेला बळीराजा काहिसा सुखावला..‌शेती-शिवारात बिजांकूर बाळसं धरते आहे..माऊलींच्या दूधापरी आले मृगाचे तूषार..भूकेजल्या तान्ह्यासम तोंड पसरी शिवार..पाऊस आणखी मनसोक्त बरसल्याने खरीप हंगामाला बहर येईल..अशी आशा शेतकरी उराशी बाळगून आहे.

मॉन्सून सरी कोसळण्याआधी गर्जना करीत येणारा वळवाचा पाऊस शेतकऱ्यांना शुभ संदेश देतो की, मी लवकरच येणार. पाऊस हा बळीराजाची लक्ष्मी बळकट करणारा असेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. पावसाळ्याच्या पहिल्या चरणात तो ठरल्याप्रमाणे आला नी गेला पण त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडच पाणी पळाले. पावसाच्या तीन नक्षत्रानी मात्र यंदा हात आखुडता घेतला आहे. थोड्याफार झालेल्या पावसान शेती शिवारात ओलावा आल्याने खरीपाची पेरणी ऊरकुन घेतली. काही भागात धुळपेरणी करण्यात आली होती त्यांच भल झालं.

बाजारपेठेत बी-बियाणे, खते, औषधी खरेदीसाठी काहिसी रेलचेल सुरू आहे. यंदा व्यापाऱ्यांनी मालाचे दर अव्वाच्या- सव्वा केल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. घरातील होत नव्हत सारकाही विकुन काळ्या आईची ओटी भरली. येणाऱ्या काळात घरदार धनधान्यानी गजबजून जाव आणि लक्ष्मीचा वास व्हावा हिच अपेक्षा ऊरी बाळगून जगाचा पोशिंदा स्वप्न पाहतो आहे. खरीप पिकासाठी पुरेसा पाऊस झाला नसल्याने वरूणराजा आणखी प्रसन्न व्हावा अशी प्रार्थना शेतकरी करीत आहे.

कापसाचे क्षेत्र वाढले

तालुक्यात ९०० ते एक हजार मिलिमीटर पर्जन्यमानाची सरासरी असून यावर्षी आज पर्यंत केवळ ७५ मीलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जवळपास बहूतांशी शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली आहे. खरीपाचे एकूण (३९,३०४ हेक्टर) पैकी ज्वारी (२१० हेक्टर), मका(३०), तूर (२,६४०), वैरण (५०), हळद (१, २५०), केळी (८२०), सोयाबीन (५,७६७), कापूस (१,६४५०), उडीद(७०), मुग (१२०) हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.