Nanded : खासदारांनी लक्ष दिले असते तर दिवाळीत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले असते

केंद्राने रोखले पैसे; शेतकरी पुत्र संघर्ष समितीचा आरोप
शेतकरी पुत्र संघर्ष समिती
शेतकरी पुत्र संघर्ष समितीesakal
Updated on

नांदेड : केंद्राची सबसिडी येणे शिल्लक असल्याने शेतकऱ्यांना दिवाळीत मदत मिळत नाही. त्याकडे खासदारांनी लक्ष द्यावे. जर खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पाठपुराव्यामुळे पिकविमा मंजूर झाला असेल तर सबसिडी केंद्राने अडवून धरली नसती आणि इतर जिल्ह्याप्रमाणे दिवाळी पूर्व वाटप केली असती. पण, त्याकडे लक्ष न देता श्रेय घेण्याचा खटाटोप खासदारांनी चालविला आहे. शेतकरी पुत्र संघर्ष समितीच्या उपोषणाच्या यशानंतर दुसरेच श्रेय घेत असल्याचा आरोप शेतकरी पुत्र संघर्ष समितीने केला आहे.

शेतकरी पुत्र संघर्ष समिती
Nanded : आगामी काळात नांदेड शहर विकासात ठरेल अव्वल

याबाबत शेतकरी पुत्र संघर्ष समितीतर्फे निवेदन देण्यात आले आहे. जिल्ह्यात एकुण ३९१ कोटी १७ लाख रुपयांचा सोयाबीन पिकांचा पिक विमा मंजूर करण्यात आला असून तो शेतकऱ्यांच्या खात्यात वेळेवर मिळावा, यासाठी शेतकरी पुत्र संघर्ष समितीच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले. त्यामुळे त्याची दखल घेत शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार असल्याची माहिती समितीतर्फे बालाजी पाटील ढोसणे, बालाजी पाटील सांगवीकर, गजानन पाटील होटाळकर, अनिल पाटील दापके, अंकुश पाटील कोल्हे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

शेतकरी पुत्र संघर्ष समिती
Nanded : ‘भाऊराव’ ने शेतकऱ्यांचे हित साधले

ही पिकविम्याची मंजुर रक्कम केंद्र शासनाचा हिस्सा मिळाला नसल्यामुळे दिवाळी पूर्व पडली नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारमय होत आहे. या गोष्टीचा खासदार चिखलीकर यांनी विचार करून जर केंद्राचा अडकून असलेला हिस्सा दिवाळीपूर्व खेचून पिकविमा कंपनीला वाटप करायला भाग पाडला असता तर शेतकरी पुत्र संघर्ष समितीने त्यांना श्रेय दिले असते पण ऐनवेळी येऊन लोकप्रतिनिधीमध्ये श्रेय घेण्याचा खटाटोप असल्याचा घणाघात शेतकरी पुत्र संघर्ष समितीने पत्रकाद्वारे केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.