नांदेड : महापालिकेपुढे २६२ नाले सफाईचे आव्हान

माॅन्सूनपूर्व आढावा बैठक; सभापती, आयुक्तांची उपस्थिती
Nanded Municipal Corporation meeting Sanitation Water Supply Department
Nanded Municipal Corporation meeting Sanitation Water Supply Department sakal
Updated on

नांदेड : हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदाही मान्सूनचे लवकर आगमन होणार असून पावसाची सरासरीही जास्त राहणार आहे. त्यामुळे आत्तापासून नालेसफाईचे काम हाती घेण्याच्या सूचना स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी यांनी बुधवारी दिल्या. नांदेड वाघाळा महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात बुधवारी महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने आणि स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्सूनपूर्व आढावा बैठक घेण्यात आली.

त्याचबरोबर स्वच्छता व साफसफाई, मलनिस्सारण आणि पाणीपुरवठा विभागाचीही आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी श्री. स्वामी बोलत होते. यावेळी उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे, निलेश सुंकेवार, नगरसचिव अजितपालसिंघ संधू, शहर अभियंता बाशेट्टी, कार्यकारी अभियंता कलीम परवेज, सुग्रीव अंधारे, सहायक आयुक्त गुलाम सादेक, संजय जाधव, डॉ. मिर्झा बेग, रमेश चवरे, राजेश चव्हाण, रावण सोनसळे, डॉ. रईसोद्दीन आदी उपस्थित होते.

महापालिकेकडे असलेल्या माहितीनुसार शहरात एकूण २६२ लहान मोठे नाले आहेत. त्यातील १५७ नाले मनुष्यबळाद्वारे, ६९ नाले जेसीबीद्वारे, ३६ नाले पोकलेनद्वारे साफ करायचे आहेत. त्याचबरोबर शहरात ६५ सखल भाग असून तेथे पावसाळ्यात पाणी साचते. या कामासाठी मनुष्यबळ वाढवा तसेच मशिनरी उपलब्ध करून कामे सुरू करा. नाल्यांची साफसफाई चांगल्या प्रकारे करा. नाल्यातून काढलेला गाळ त्वरीत उचला. सखल भागात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्या, अशा सूचना यावेळी श्री. स्वामी यांनी दिल्या. आपत्ती काळात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समन्वय ठेऊन काम करावे. काही अडचणी आल्यास माझ्याशी संपर्क करावा, असे आवाहनाही त्यांनी केले.

कामात निष्काळजीपणा करू नका. फक्त मजुरांची संख्या वाढवून चालणार नाही तर त्यांच्याकडून चांगले काम करून घ्यावे. पूरग्रस्त भागात वेगळी आपतकालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. महापालिकेच्या इमारतीवर बसविण्यात येणाऱ्या सोलार सिस्टीमचीही त्यांनी माहिती घेतली व ही यंत्रणा लवकर कार्यान्वित करण्याच्या सूचना केल्या.

वेळेवर पाणीपुरवठा करावा

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने वेळेवर पाणीपुरवठा करावा. अनेकांच्या तक्रारी येत असून सध्या उन्हाळा असल्यामुळे पाण्याची गरज जास्त आहे. अशा वेळी ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळेवर स्वच्छ पाणीपुरवठा करावा. त्याचबरोबर पाणीटंचाई असलेल्या भागात टॅंक्टरने पाणी पुरवठा करण्याच्या सूचना सभापती श्री. स्वामी यांनी दिल्या. ब्लिचिंग पावडर आणि तुरटी यांच्या साठ्याची माहितीही त्यांनी यावेळी घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.