Video - नांदेडला दंडात्मक कारवाईसाठी महापालिका पथक झाले कार्यान्वित 

Nanded News
Nanded News
Updated on

नांदेड :  महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने संविधान दिनी कोविड-१९च्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरुद्ध आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या निर्देशानुसार मुल्य निर्धारक व कर संकलन अधिकारी अजितपालसिंघ संधू यांनी सहा पथकाची स्थापना केली आहे. सदर पथकाने दोन दिवसांत ३८९ जणांवर दंडात्मक कारवाई करून ४९ हजार २०० रुपयांचा दंड वसुल केला आहे. 

कोरोनाची संख्या कमी होत असताना दिवाळीनंतर कोरोनाच्या संख्येत वाढ होत आहे. सोशल डिस्टन्सींगचे पालन न करणे, मास्कचा वापर न करणे व सॅनिटायझरचा देखील उपयोग न करणे या बाबीमुळे मनपा क्षेत्रात कोरोना संख्येत वाढ होत होती. दरम्यान सुरुवातीच्या काळामध्ये नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी महापालिकेने पथकाची नियुक्ती केली होती.

परंतु, काही दिवसच हे पथक कार्यान्वीत होते. नंतर मात्र गायब झाले होते. त्यामुळे नागरिक बिनधास्त फिरत होते. दरम्यान महापालिका प्रशासनाच्या हे लक्षात आल्यानंतर बुधवारपासून (ता.२६) शहरात सहा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकाने दोन दिवसांतच तोंडाला मास्क न लावणे, सॅनिटायझरचा वापर न करणे, सोशल डिस्टन्सिंग न ठेवणे आदींवर दंडात्मक कारवाई करून दंडाची रक्कमही वसुल केली आहे. 

गुरुवार (ता.२६) आणि शुक्रवारी (ता.२७) महापालिकेच्या पथकाने सहाही झोनमध्ये एकूण ४२० जणांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून ४९ हजार २०० रुपयांचा दंड देखील वसुल करण्यात आला आहे. त्यामध्ये सांगवी तरोडा झोन - २७ जणांकडून दोन हजार ७००, अशोकनगर झोनमध्ये १८० जणांकडून २१ हजार ४०० रुपये, गणेशनगर झोनमध्ये २९ जणांकडून चार हजार ८०० रुपये, वजिराबाद झोनमध्ये ८१ जणांकडून १० हजार रुपये, इतवारा झोनमधून ५९ जणांवर पाच हजार ९०० तर सिडकोमध्ये ४४ जणांकडून चार हजार ४०० रुपये असा एकूण ४९ हजार २०० रुपयांचा दंड वसुल झालेला आहे. 

कोविड-१९ नियमांचे पालन करावे 
कोरोना संसर्गाला हरविण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी मास्क वापरावा, याचबरोबर सोशल डिस्टन्सींगचे पालन करून सॅनिटायझरचे वापर करणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकांनी जनाबदारी पार पाडली तर शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास निश्चितपणाने यश येणार आहे. 
- अजितपालसिंग संधू, कर संकलन अधिकारी मनपा, नांदेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.