Nanded News : नांदेड जिल्ह्यात ३८ हजार ३९० मतदार वाढले

मतदारयादीला मुदतवाढ; आतापर्यंत २६ लाख ७१ हजार १९४ मतदारांची झाली नोंद
nanded
nandedsakal
Updated on

नांदेड : निवडणुक आयोगाच्या सुचनेनुसार मतदार यादी तयार करण्यात येत असून आत्तापर्यंत म्हणजेच ता. ११ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात २६ लाख ७१ हजार १९४ मतदारांची नोंद झाली आहे. अर्ज क्रमांक सहा म्हणजेच नवीन ३८ हजार ३९० मतदारांची नोंद झाली आहे तर ४६ हजार ६७६ मतदारांची नावे वगळणीत (अर्ज क्रमांक सात) आहेत. कुणीही मतदानापासून वंचित राहू नये, म्हणून निवडणुक आयोगाने सुधारित कार्यक्रम पाठवला असल्यामुळे मुदतवाढ देण्यात आली असून आता अंतिम मतदार यादी ता. २२ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे.

जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण मतदारसंख्या २६ लाख ७१ हजार १९४ झाली असून त्यात १३ लाख ८१ हजार २९ पुरूष मतदार, १२ लाख नऊ हजार ११ स्त्री मतदार तर १५४ इतर मतदारांचा समावेश आहे. आगामी काळातील लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन सध्या निवडणुक आयोगाच्या वतीने मतदार यादी अंतिम करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघ असून मतदारसंघनिहाय मतदार यादीचे काम सुरू करण्यात आले आहे.

त्यात नवीन मतदारांची नोंद करणे, स्थलांतर किंवा मयत झाले असतील तर नाव वगळणे तसेच पत्ता, फोटो आदी कामे करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि निवडणुक विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुक विभाग मतदार यादीच्या कामात व्यस्त झाला आहे. ता. २२ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली असल्याने मतदारांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

विधानसभा पुरुष मतदार नोंदणी स्त्री मतदार नोंदणी इतर एकूण नविन मतदार मतदार वगळले

  • किनवट एक लाख ३६ हजार ८७९ एक लाख २८ हजार ६६१ अकरा दोन लाख ६५ हजार ५५१ पाच हजार ६८५ सात हजार ६१८

  • हदगाव एक लाख ५० हजार ६७ एक लाख ३७ हजार ८३० तीन दोन लाख ८७ हजार ९०० पाच हजार ६७ तीन हजार ७८४

  • भोकर एक लाख ४९ हजार ६५४ एक लाख ४१ हजार ४९१ पाच दोन लाख ९१ हजार १५० तीन हजार ५४५ सहा हजार ८७३

  • नांदेड उत्तर एक लाख ७४ हजार ९३३ एक लाख ६४ हजार २५९ ९७ तीन लाख ३९ हजार २८९ पाच हजार ६२१ तीन हजार ५४

  • नांदेड दक्षिण एक लाख ५६ हजार ३४१ एक लाख ४७ हजार २९९ तीन तीन लाख तीन हजार ६४३ दोन हजार ९६१ चार हजार २९८

  • लोहा एक लाख ५० हजार ६४२ एक लाख ४० हजार ३९४ सहा दोन लाख ९१ हजार ४२ चार हजार १४४ चार हजार ७३

  • नायगाव एक लाख ५३ हजार ९७६ एक लाख ४४ हजार ४५८ दहा दोन लाख ९८ हजार ४४४ चार हजार २५९ सहा हजार ७०५

  • देगलूर एक लाख ५५ हजार ३६ एक लाख ४६ हजार २९ १४ तीन लाख एक हजार ७९ तीन हजार १९५ सहा हजार १४२

  • मुखेड एक लाख ५३ हजार ५०१ एक लाख ३९ हजार ५९० पाच दोन लाख ९३ हजार ९६ तीन हजार ९१३ चार हजार १२९

  • एकूण १३ लाख ८१ हजार २९ १२ लाख नऊ हजार ११ १५४ २६ लाख ७१ हजार १९४ ३८ हजार ३९० ४६ हजार ६७६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.