नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. यानंतर आज पुन्हा सात जणांचा मृत्यू झाला आहे. आजच्या मृतांमध्ये ४ बालकांचा समावेश आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे. (Nanded News 7 more deaths including 4 children died in government hospital)
ट्वीट करत चव्हाण यांनी सांगितलं की, नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कालपासून आणखी ७ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये ४ बालकांचाही समावेश आहे. राज्य सरकारनं या रुग्णालयातील मृत्यूंची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (Latest Marathi News)
दरम्यान, एका सामटिव्हीशी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, सकाळपर्यंतची माहिती अशी आली आहे की, ७ रुग्णांचा रात्रभरातून मृत्यू झाला आहे, स्वतः रुग्णालयाच्या डीननं आम्हाला ही माहिती दिली आहे. (Marathi Tajya Batmya)
म्हणजे २४ आणि ७ अशा ३१ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब आहे. मी कालच त्यांना म्हटलं होतं की, जे झालं ते गंभीर आहे पण जे रुग्ण गंभीर आहेत त्यांचा जीव वाचवणं हे महत्वाचं आहे. यासाठी जे खासगी डॉक्टर्स, औषध पाहिजेत ते सांगा. सरकारनं याचा तातडीनं पुरवठा केला पाहिजे.
काल नांदेडच्या याच वैद्यकीय महाविद्यालयात २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. यामध्ये १२ बालकांचा समावेश होता. त्यानंतर रात्रीतून पुन्हा ७ रुग्णांचा मृत्यू झाला त्यात ४ बालकांचा समावेश आहे. त्यामुळं दिवसभरात ३१ रुग्णांचा मृत्यू झाला असून यामध्ये १६ बालकांचा समावेश आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.