Nanded News : ऑनलाइन फसवणूक टाळता येणे शक्य

पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे : गोदावरी अर्बनच्या मुख्यालयात कार्यक्रम
nanded news
nanded news sakal
Updated on

nanded - आॅनलाईनमुळे जग जवळ आले आहे. अमेरिकेत घडलेली एखादी घटना अगदी काही सेकंदात तुमच्या खिशातील मोबाइलवर येते. बऱ्याचदा अनवधानाने आपल्या हातुन नको ती चुक घडते आणि आपल्या मोबाईलशी लिंक असलेल्या खात्यातून पैसे कपात झाल्याचा मेसेज येतो तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे कळते.

आॅनलाईन होणारी ही फसवणूक टाळण्यासाठी कमीत कमी पैसे असलेले खाते केवायसीशी जोडले पाहिजे, असा सल्ला पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला.

गोदावरी अर्बनच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांच्या संकल्पनेतील ‘वी कॅन डू गोदावरी टॉक्स शो’ चे गोदावरी अर्बनच्या सहकारसूर्य मुख्यालयात शुक्रवारी (ता. एक) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून राजश्री पाटील यांनी पोलीस अधीक्षक कोकाटे यांना शैक्षणिक आणि

nanded news
Nanded News : जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

प्रशासकीय कार्यप्रणाली संदर्भात बोलते केले. त्यावेळी ते बोलत होते. श्री. कोकाटे म्हणाले की, कुणाचीही आॅनलाईन फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही सायबर सेक्युरिटी अॅम्बेसेटरची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी सर्वसामान्य जनतेत जाऊन त्यांना आॅनलाईन फसवणूक टाळण्यासाठी सावधगिरीचे धडे दिले जात आहेत.

nanded news
Benefits Of vitamin D: फक्त कॅल्शियमच नाही तर मजबूत हाडांसाठी हे व्हिटॅमिन्सही आहेत खूप महत्त्वाची, जाणून घ्या

प्रत्येक नागरीक आपल्या खिशातील पर्समध्ये कमीत कमी पैसे ठेवतो. त्याचप्रमाणे फसवणूक टाळण्यासाठी कमी पैसे असलेले बँक खाते इ - अकाउंटशी जोडावे, असा सल्ला त्यांनी दिला.

अध्यक्षीय समारोप करताना राजश्री पाटील म्हणाल्या की, गुन्हेगारी रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्याने सर्वोत्कृष्ट काम केले आहे. पोलीस अधीक्षक कोकाटे यांच्या बोलण्यात सतत सामान्य माणूस सर्वात पुढे असतो.

nanded news
Marathwada Rain News : मराठवाड्यातील १४८ मंडळांत अतिवृष्टी

यावेळी स्नेहल कोकाटे यांनी पती श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासाठी लिहलेल्या पत्राचे वाचन राजश्री पाटील यांनी केले. प्रा. सुरेश कटकमवार यांनी आभार मानले. या वेळी बॅँकेचे प्रधान व्यवस्थापक विजय शिरमेवार, लेखा विभाग व्यवस्थापक आनंद संगावार, मार्केटिंग मॅनेजर महेश केंद्रे, व्यवस्थापक देवीदास पौळकर, सहायक व्यवस्थापक प्रशांत कदम, मुख्य शाखेचे व्यवस्थापक अविनाश बोचरे, सिडको शाखेचे व्यवस्थापक पंकज इंदरकर, चिखलवाडी व्यवस्थापक गुरुतेजसिंग चिरागीया यांच्यासह मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.