Nanded News : चिंतन बैठकीपूर्वी शाब्दिक चकमक;नांदेडला भाजप पदाधिकारी-कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले

लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघातील भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पराभवाच्या विश्लेषणासाठी पक्ष निरीक्षक तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील रविवारी (ता. २३) येथे आले होते. शासकीय विश्रामगृहात त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली.
Nanded News
Nanded Newssakal
Updated on

नांदेड : लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघातील भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पराभवाच्या विश्लेषणासाठी पक्ष निरीक्षक तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील रविवारी (ता. २३) येथे आले होते. शासकीय विश्रामगृहात त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. बैठकीपूर्वीच पदाधिकारी- कार्यकर्त्यांत शाब्दिक चकमक उडाली. यावेळी काही पदाधिकारी-कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. त्यामुळे पक्षशिस्तीस गालबोट लागल्याने अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

विखे पाटील हे शनिवारी (ता. २२) शहराच्या दौऱ्यावर येणार होते. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मतदारसंघात येणार असल्याने ऐनवेळी त्यांना हा दौरा रद्द करावा लागला होता. विशेष विमानाने आज ते दुपारी बाराच्या सुमारास येथे आले. त्यांच्या उपस्थितीत विश्रामगृहात चिंतन बैठकीपूर्वीच कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला. यावेळी काही पदाधिकारी-कार्यकर्त्यांत शाब्दिक चकमकही उडाली. निवडणुकीत काम केले नाही आणि बैठकीत हजर राहता, असे म्हणत कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. दरम्यान, पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटविला.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. यापूर्वीही नांदेडमधील आभार बैठकीत दोन पदाधिकाऱ्यांच्या सर्मथकांनी असाच गोंधळ घालत एकमेकांविरुद्ध नारेबाजी केली होती. निवडणुकीत महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी काम केले नाही, असा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

कार्यकर्त्यांनी तक्रारींचा वाचला पाढा

विखे पाटील यांनी दुपारी एकच्या सुमारास बैठकीला सुरवात केली. यावेळी त्यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेत कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. नांदेड दक्षिण मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी विरोधात काम केल्याने चिखलीकरांचा पराभव झाल्याचा आरोप केला. त्यांच्याविषयी तक्रारींचा पाढाच पक्षनिरीक्षकांसमोर वाचण्यात आला, असे सूत्रांनी सांगितले. ही बैठक सायंकाळी पाचपर्यंत सुरू होती.

अशोक चव्हाण यांची गैरहजेरी

माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी (ता. २२) येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर आज मंत्री विखे पाटील यांनीही बैठक घेतली. मात्र, दोन्ही नेत्यांनी घेतलेल्या बैठकीस माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण गैरहजर होते. त्यामुळे चर्चेला उधाण आले. खासगी कामानिमित्त आपण मुंबईला जाणार असल्याचे त्यांनी दोन दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. मुंबईत दोन्ही पक्षनिरीक्षकांकडे आपले मत मांडणार असल्याचेही चव्हाण म्हणाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com