नांदेड : नांदेड जिल्हा मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी एक असून महाराष्ट्राच्या दक्षिण पुर्व सीमेला दक्षिण - उत्तर पसरलेला आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस यवतमाळ तर पश्चिमेस परभणी, हिंगोली व नैऋत्येस लातूर जिल्हा आहे. पूर्व दिशेला तेलंगणा प्रदेशातील आदिलाबाद व निझामाबाद हे जिल्हे आहेत. जिल्ह्याचे एकूण भौगोलिस क्षेत्रफळ १०५२८०० हेक्टर आहे.
नांदेड वनविभागाचे एकूण क्षेत्र १३००७६.५०२ हेक्टर एवढे आहे. वनविभागाच्या भौगोलिक क्षेत्रापैकी १२.३५ टक्के वन आहे. त्याच्या व्यवस्थापनासाठी माहुर, किनवट, मांडवी, बोधडी, इसापुर, अप्पारावपेठ, हदगाव, हिमायतनगर, नांदेड, भोकर, मुखेड व देगलूर असे एकूण १२ वनक्षेत्र आहेत. जिल्ह्यात एकूण एक हजार ६०३ गावे असून, त्यापैकी ४१० गावे वनक्षेत्र असलेली आहेत. वनांच्या संवर्धनासाठी वन विभागातील बारा, वन परिक्षेत तीन आणि एक स्ट्राईक फोर्स अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक आहे. तसेच वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी कृत्रीम पाणवठे तयार केले असून, त्यामुळे वन्य प्राण्यांची संख्या वाढताना दिसत आहे. या मुळे जंगलातील वन्यजिवसुद्धा वाढल्याने जंगलाचे महत्व वाढते.
वनपरिक्षेत्रनिाय वन्यप्राणी गणना (ता. १६ ते ता. १७ मे)
माहूर - ३४१, मांडवी - २२८, किनवट - २९३, बोधडी - ४७, अप्पारावपेठ - १००, इस्लापुर - २५३, हिमायतनगर - ३४४, हदगाव - ७९८,
भोकर - १९५, नांदेड - ३२८, देगलूर - ५०९, मुखेड - २६४ असे एकूण तीन हजार सातशे वन्य प्राण्यांची नोंद वन्यप्राणी गणनेत झाली आहे.
वनात असलेली झाडे
साग, सप्तपर्णी, बांबु, खैर, हिवर, हळदु, बेल, महारुख, कृष्णा, शिरस, चिचावा, किन्ही, धावडा, रक्त, पळस, कवट, पिंपळी, वड, उंबर, पिंपळ, घोगर, शिवण, कड, अंजन, रुषी, मोई, सुबांबुळ, मोहा, केसरी, खिरणी, बाकन, बाकुली, कळंब, शेवगा, तिवस, शेंडी, आवळा, बिजा, करंज आदी.
आढळलेले वन्य प्राणी
अस्वल, बिबट, रानडुक्कर, निलगाय, चितळ, भेकड, वानर, माकड लालतोंडी, रानमांजर, सायाळ, ससा, कोल्हा, मुंगुस, लांडगा, काळविट असे एकूण तीन हजार सातशे वन्यप्राणी असल्याची नोंद ता. १६ ते ता. १७ मे च्या नैसर्गिक व कृत्रिम पाणस्थळावरील प्राणीगणनेत झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.